कोरोना रुग्णाचा हॉस्पिटलच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

07 Sep 2020 11:23:54
जव्हार :  पालघर जिल्ह्यातील वाडा येथे राहणाऱ्या एका अत्यवस्थ रुग्णाने विक्रमगड तालुक्यातील हातने गावातील रिवेरा समर्पित कोरोना उपचार रुग्णालयाच्या गच्चीवरून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत रुग्णाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
 
palghar-covid-hospital_1&
 
वाडा येथील हा 38 वर्षीय रुग्ण कोरोनाबधित असून वाड्यातील पोशेरी उपचार केंद्रामध्ये त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, तो अत्यवस्थ झाल्याने त्याला अतिदक्षता कक्षात उपचाराची आवश्यकता होती. त्याला शनिवारी रात्री विक्रमगड येथील रिव्हेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी सकाळच्या सुमारास लघुशंकेला जात असल्याचे येथील कर्मचाऱ्यांना सांगत तो स्वच्छतागृहाकडे न जाता थेट रिव्हेरा रुग्णालयाच्या गच्चीवर गेला व गच्चीवरून उडी मारून आत्महत्याचा
प्रयत्न केला. या घटनेत रुग्णाच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0