विधान परिषद उपसभापतीपदी भाजपतर्फे भाई गिरकर यांची उमेदवारी

जनदूत टिम    07-Sep-2020
Total Views |
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक घाईघाईने जाहीर झाली असून, भाजपतर्फे ज्येष्ठ नेते विजय उर्फ भाई गिरकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
 
Bhai Girkar_1  
 
कोरोनानिमित्ताने अनेक निर्बंध असताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने आज विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनातही विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपतर्फे ज्येष्ठ नेते भाई गिरकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
 
भाई गिरकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून, त्यांना कोकणात मोठा जनाधार आहे.आमदार भाई गिरकर यांनी आज विधिमंडळात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आमदार सुरेश धस, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, रमेश पाटील आदींची उपस्थिती होती.