'मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच, मान्य नसेल त्यांनी...', संजय राऊतांनी कंगनाला सुनावलं

जनदूत टिम    05-Sep-2020
Total Views |
मुंबई : कंगना रानौतने मुंबईत पीओकीमध्ये असल्याची भावना येतेय, असं वक्तव्य केलं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर चहू बाजूंनी टीका होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला पुन्हा एकदा सुनावलं आहे. 'मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा..शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही,' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
 
kangna-ranut1_1 &nbs
 
संजय राऊत यांनी मला पुन्हा मुंबईत येऊ नको अशी धमकी दिली. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते. आता मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे? असा सवाल कंगनाने उपस्थित केला.
 
यावरुन कंगनावर बॉलीवूड, मराठी इंडस्ट्री आणि राजकीय नेत्यांपासून सगळ्यांनी टीका केली. दरम्यान कंगनाच्या मुंबईच्या वक्तव्यावरून वातावरण पेटलं आहे. यावरून कंगनाला मुंबईत न येणाचा सल्ला देणाऱ्यांना कंगनाने पुन्हा एक आव्हान दिलं आहे. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, असं म्हणत कंगनाने आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं सांगितलं आहे.