PUBG ला आता FAU-G चा पर्याय

जनदूत टिम    04-Sep-2020
Total Views |
मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने PUBG गेमला पर्याय म्हणून FAU-G गेम आणला आहे. देशात PUBG हे प्रचंड लोकप्रिय गेमिंग अ‍ॅप होतं. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत या गेमची क्रेझ होती. मात्र, केंद्र सरकारने PUBG वर बंदी आणली आहे. त्यामुळे PUBG गेमच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
 
PUBG-and-FAUG_1 &nbs
 
मात्र, त्यांना आता PUBG ला पर्याय म्हणून FAU-G गेम खेळता येणार आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनवर डिजीटल सर्जिकल स्ट्राईक करत तब्बल ११८ चिनी अ‍ॅप्सवर बंदी आणली. यामध्ये PUBG गेमिंग अ‍ॅपचादेखील समावेश आहे. मात्र, PUBG ला पर्याय म्हणून अक्षय कुमारने FAU-G गेम आणला आहे . अक्षय कुमारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला समर्थन देत FAU-G गेम सादर करताना अत्यंत आनंद होत आहे. या गेममध्ये प्लेयर्स मनोरंजन व्यतिरिक्त सैनिकांच्या बलिदानाविषयी माहिती मिळवू शकतील. या गेममधून जे उत्पन्न येईल त्यापैकी 20 टक्के रक्कम भारताच्या ‘वीर ट्रस्ट’साठी दान केलं जाईल”, अशी घोषणा अक्षय कुमारने केली आहे.