विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण

जनदूत टिम    04-Sep-2020
Total Views |
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आहे. नाना पटोले यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. “करोनाची लक्षणं जाणवू लागल्यामुळे मी माझी करोना चाचणी केली असून त्याचे अहवाल सकारात्मक आले आहेत,” अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असंही ते म्हणाले.
 
nana Patole_1  
 
“गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्मक आली आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये,” असं नाना पटोले म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली.
 
“गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची करोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच करोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन, असंही ते म्हणाले.