कंत्राटी कामगारांना कीमान वेतनकायद्यानूसार मिळणार वेतन! - आयूक्त पंकज आसिया

27 Sep 2020 17:02:50

दोनमहिने वेतन नाही, कामगांराचे हाळ

अनगांव : गेल्या पंधरा वर्षापासून भिंवडी महानगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात बोरवेल पाईपलाईन निगा दूरूस्ती व वाँलमनच काम करणा-या कंत्राटी कामगारांना जूलै , ऑगष्ट या दोन महिन्याचा पगार किमानवेतन कायद्या नूसारच देण्यात येणार असून कामागरांना प्रेमेटशिल्प, भविष्य निर्वाह निधी,ओळखपत्र, गणवेश ,बोनस या मागण्या पंधरा दिवसात सोडविणार आसल्याचे अश्र्वासन भिंवडी महापालिकेचे आयूक्त डॉ पंकज असिया यांनी यांनी दिली. महानगरपालिकेचे आयूक्त डाँ पंकज आसिया यांनी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिका-या सोबत झालेल्या बैठकीत दिली.
 
Bhiwandi_1  H x
 
भिंवडी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात वाँलमन व बोअरवेल दूरूस्तीच काम करणाऱ्या कामगांराना जूलै २०१९ पासून किमान वेतन मंजुर झाला आहे. माञ कामगाराना किमान वेतन कायद्यानूसार नूसार वेतन मिळत नाही.महानगरपालिका ठेकेदारांना वेतन देते.ठेकेदार कामगारांना सोई सूविधा देत नाहीत. त्या सूविधा न दिल्यास आदोलन करण्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोलेकर जिल्हा अध्यक्ष अशोक सापटे श्रमजीवी कामगार संघटनेचे भिंवडी तालूका अध्यक्ष अँड रोहिदास पाटील यानी लेखी निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेऊन भिंवडी मनपाचे आयूक्ता सोबत संघटनेच्या पदाधिकारी यांची बैठक झाली त्या बैठकीत जूलै आँग्रस्ट या दोन महिन्याचा पगार दिले जाणार आसल्याची माहिती देऊन कामगारांना किमानवेतन कायद्यानूसार नूसार वेतन दिले जाईल व मागील वेतनातील फरक दिले जाईल. कामगांराना ग्लोज मास्कवाँटरशूज,वाहन, प्रेमेटशिल्प देण्यात येईल तशा सूचणा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना आयूक्तनी दिल्या आहेत. पंधरा दिवसांत अधिकारी, संघटनेचे प्रतिनीधी ठेकेदार यांची बैठक घेण्यात येणार असल्याच आयूक्ता जाहिर केले आहे .
 
मनपातील कंत्राटी कामगाराच्या मागण्यासंबधी पालिका सभाग्रहात झालेल्या या बैठकीस संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रेय कोलेकर श्रमजीवी कामगार संघटनेचे भिंवडी तालूका अध्यक्ष अँड रोहीदास पाटील पाणीपूरवठा कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड शा़खाअभिय़ता संदिप पटनावर लेखाधिकारी जाधव ठेकेदार बाबूलाल पटेल मूक्दीर बूबेरे कामगार कमळाकर गोरले रंगनाथ तरे संदिप पाटील उपस्थित होते.
 
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्राद्रूर्भाव आसतानाही कामगार आपला जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडूण काम करीत आसतानाही कामगारांना दोन महिन्याचा वेतन दिले नाही.ते वेतन आठ दिवसात देण्याच्या सूचना आयूक्तानी एल पी गायकवाड, संदिप पटनावर यांना दिले आहेत.त्यानूसार कार्यवाही करावी अशी मागणी श्रमजीवी कामगार संघटनेचे भिंवडी तालूका अध्यक्ष अँड रोहीदास पाटील यांनी केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0