राज्यात २४ तासांत आठ पोलिसांचा मृत्यू ,३७१ नवे करोनाबाधित

जनदूत टिम    15-Sep-2020
Total Views |
राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. यामध्ये सर्वसामान्यांपासून ते अगदी आजीमाजी मंत्र्यांसह करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे. शिवाय, करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आठ पोलिसांना करोनामुळे जीव गमावावा लागला आहे. तर, आणखी ३७१ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

Mumbai-police_1 &nbs
 
राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ हजार ७५६ वर पोहचली असून, यामध्ये ३ हजार ७२४ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले १५ हजार ८३० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या २०२ जणांच्या संख्येचा समावेश आहे.


करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.