माजी मंत्री अर्जुन खोतकरांना कोरोनाची लागण

जनदूत टिम    13-Sep-2020
Total Views |
जालना : शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुकवर पोस्ट टाकत याबाबतची माहिती दिली. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

khotkar_1  H x  
 
माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. “लोक संकटात असताना नेतृत्वाने घरात बसून चालत नाही. कोविडचे सर्व नियम पाळूनदेखील लोकहिताची कामे करताना अखेर कोविडने मला गाठलेच. मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात मी उपचार घेणार असून ईश्वरकृपेने आणि लोकाशिर्वादाने लवकरच यातून बाहेर पडेल. आपल्या सदिच्छा आणि आशिर्वाद हेच माझे बळ आहे.”
“माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपआपली टेस्ट करून घ्यावी. घरीच रहा, सुरक्षित रहा शासनाच्या निर्देशानाचे सर्वांनी पालन करावे आणि सुरक्षित रहावे,” अशी पोस्ट अर्जुन खोतकर यांनी केली आहे.