आमदार कैलास पाटील यांना कोरोनाची लागण

जनदूत टिम    11-Sep-2020
Total Views |
उस्मानाबाद : उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शुक्रवारी दुपारी पॉझिटिव्ह आला आहे.
 
kailas_1  H x W
 
त्यांनी रविवारीच अधिवेशनापूर्वी चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. अधिवेशनाच्या अगोदरही मी टेस्ट केली होती, त्यावेळी अहवाल निगेटिव्ह आला असल्याने मी अधिवेशनात सहभागी झालो होतो. पण गुरुवारी पुन्हा टेस्ट केली होती, अहवाल आताच प्राप्त झाला असुन त्यामध्ये मी पॉझिटिव्ह आलो आहे. त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसापुर्वी माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी काळजी घ्यावी व लक्षणे आढळुन येत असल्यास तातडीने टेस्ट करुन घ्यावी असे आवाहन आमदार पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
 
माझी प्रकृती ठिक असुन काळजीचे कोणतेही कारण नाही. लवकरच उपचार घेऊन मी पुन्हा तुमच्या सेवेसाठी तयार असेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.