वसिंदच्या नागरिकांची लवकरच विजेच्या समस्यांपासून सुटका

जनदूत टिम    11-Sep-2020
Total Views |

Vasind_1  H x W 
 
वासिंद : वसिंद मधील नागरिकांच्या विजेच्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेनेचे उपतालुका प्रमुख बंडू शृंगारपुरे, तालुका सदस्य दत्ता शेठ ठाकरे, शिवसेना वसिंद शहर प्रमुख विकास शेलार साहेब, माजी वसिंद ग्रा उपसरपंच राजेंद्रजी भेरे साहेब, वार्ड क्र ४ चे शाखा प्रमुख समीर जोशी साहेब व श्री प्रकाश वाघमारे, तानाजी जाधव, सचिन रसाळ याच्या उपस्थितीत शहापूर महावितरण चे अधिकारी कटकवार साहेब यांना निवेदन देऊन समस्याचा पाढा वाचला दररोज होणार विजेचा लपंडाव, लोढ शेडिंग चे टायमिंग कमी करणे जीर्ण विजेचे पोल बदलणे, कर्मचारी वाढवणे, टाटा सबस्टेशन तात्काळ सुरू करणे व २४×७ वीज वसिंद च्या नागरिकाना मिळावी म्हणून पडघा येथून इन्कमर आणून स्वतंत्र फिडर बसवणे अश्या अनेक तक्रारीच लवकरात लवकर निरसन करून वसिंद चं नागरिकांना विजेच्या त्रासापासून लवकरात लवकर सुटका द्यावी अश्या प्रकारची मागणी करण्यात आली त्यावर कटकवार साहेबांनी तात्काळ प्रतिसाद देऊन कामाची आखणी करून वसिंद च्या नागरिकांना लवकरात लवकर या समस्यापासून सुटका करण्याची भूमिका घेतली आणि त्या प्रकारचे आदेश सर्वांसमोर त्या त्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिले दोन आठवड्यात वसिंदच्या समस्या दूर करणार अशी हमी घेतली.