डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी आढळले दोन मृतदेहचिखले व नरपड समुद्र किनाऱ्यावर मृतदेह आढळले

जनदूत टिम    09-Aug-2020
Total Views |
डहाणू: डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी आढळले दोन मृतदेह डहाणू तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर एकाच दिवशी दोन अज्ञात मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
 
Dahanu Beach_1  
 
काही दिवसांपूर्वीही या किनाऱ्यावर मृतदेह आढळल्याची घटना घडली होती.चिखले व नरपड समुद्र किनाऱ्यावर हे दोन्ही मृतदेह नागरिकांना आढळून आले. हे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने चेहरा दिसत नसला तरी गळ्यातील दोऱ्यावरून एक व्यक्ती ख्रिश्चन समाजाचा असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. चिखले येथे घोलवड पोलीस तर नरपड येथे डहाणू पोलीस पोचले असून, दोन्ही ठिकाणी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या घटनांचा पोलीस अधिक तपास करत आहेत.