श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन व्हाट्सअप वर घडवून देत असल्या बद्दल पंढरपुर मंदिर समितीचे आभार

07 Aug 2020 22:41:52
सोलापूर : गेल्या सहा महिन्या पासून कोरोना संकटा मुळे महाराष्ट्रातील सर्व मंदिर बंद आहेत महाराष्ट्रा मध्ये प्रामुख्याने पंढरपूर हे देवस्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते यावर्षी चैत्र वारी रद्द झाली, आषाढी वारी रद्द झाली आणि कितीतरी वारकऱ्यांची दर महिन्याची पंढरपूरची वारी होती ति वारी सुद्धा मंदिर बंद असल्यामुळे रद्द झालेली आहे.

Vithhal_1  H x  
 
वारकऱ्याला जर पांडुरंग परमात्म्याचे दर्शन झाले नाही तर वारकऱ्यांची अवस्था ही (जीवना वेगळी मासोळी/ तैसा तुका तळमळी) अशा पद्धतीची होते पण पांडुरंगाच्या भक्ताला दररोज पांडुरंगाचे दर्शन व्हावे या उदात्त हेतुने विठ्ठल रुक्मिणी समिती पंढरपुर यांच्या वतीने दररोज पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील भगवंताचे फोटो व्हाट्सअप वर पाठवले जातात आणि महाराष्ट्रातील सर्व वारकरी मोठ्या आनंदाने अगदी क्षणाचा विलंब न करता आपल्या मोबाईल वरच भगवंताचे दर्शन करून समाधान मानतात आणि आपल्या मित्र मंडळींना व्हाट्सअप फेसबुक वर भगवंताचे फोटो शेअर करतात. आणि विशेष म्हणजे अति अल्प कालावधी मध्ये भगवंताचे फोटो महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मोबाईलवर वारकरी आनंदाने शेअर करतात.
Powered By Sangraha 9.0