मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा मुकाबला

जनदूत टिम    07-Aug-2020
Total Views |
IPL 2020 चा 13 वा हंगाम 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती म्हणजेच (UAE) मध्ये सुरू होणार आहे. ही स्पर्धा 10 नोव्हेंबपर्यंत चालेल. कोव्हिड-19 उद्रेकामुळे ही स्पर्धा मार्चऐवजी सप्टेंबरमध्ये होत आहे.
 
IPL_1  H x W: 0
 
IPL च्या नव्या वेळापत्रकानुसार, 19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान पहिली मॅच होणार आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील. या सामन्यांचं वेळापत्रक आम्ही पुढे दिलं आहे. उपांत्यपूर्व फेरीतले सामने झाल्यानंतर 10 नोव्हेंबरला अंतिम सामना रंगेल. प्राथमिक फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत सगळ्या सामन्यांची वेळी ही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजताची असेल.
 
IPL च्या लिलावानंतर सर्वच संघांचा चेहरामोहरा बदलला आहे. मुंबई इंडियन्सच्या नावावर सर्वाधिक चार तर चेन्नई सुपर किंग्स तीन जेतेपदं आहेत. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सला यंदाच्या लिलावात 15.5 कोटी एवढी प्रचंड बोली लागली होती. सर्वाधिक बोली लागणारा विदेशी खेळाडू ठरण्याचा मान आता कमिन्सच्या नावावर आहे.