ठाणे भाजपची कार्यकारणी जाहीर : नव्या चेहऱ्यांना संधी

जनदूत टिम    06-Aug-2020
Total Views |
ठाणे : भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी जानेवारीमध्ये अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर प्रथमच ठाणे जिल्हा भाजप कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. कार्यकारिणीत ९ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, १० चिटणीस, खजिनदार आणि ९० कार्यकारिणी सदस्यांचा समावेश आहे.

BJP_1  H x W: 0
 
सर्व नवनियुक्त कार्यकर्त्यांचे हार्दिक अभिनंदन करत आमदार डावखरे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यकारिणीत तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, ठाणे शहरातील सर्व विभागांना प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये ३३ टक्के महिला प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच ठाणे महापालिका क्षेत्रात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी नव्या फळीतील कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे, अशी माहिती आमदार डावखरे यांनी यावेळी दिली आहे.