भानुदास महाराज भोईर यांच्यातर्फे मध्य वैतरणा धरण येथे आर्सेनिक अल्बम-30 च्या गोळ्यांचे वाटप

जनदूत टिम    06-Aug-2020
Total Views |
शहापूर : सामाजिक बांधिलकी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची नैतिक जबाबदारी म्हणून दि.म्युनिसिपल को .ऑ.बँक .लि.मुंबईचे विद्यमान संचालक भानुदास महाराज भोईर यांच्यावतीने वाहनचालक हिरामण महाराज आव्हाड यांनी आज हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे जलाशय मध्यवैतरणा धरण येथे कोरोना महामारी रोगाच्या विरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-30 ह्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले .

Arsenic _1  H x 
 
मुंबई महानगर पालिकेच्या जल खातेसुरक्षा खाते व परिवहन खात्यातील कामगार-कर्मचारी वर्गामध्ये या गोळ्यांचे वाटप करण्यात आले .यावेळी कामगार-कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. भानुदास महाराज भोईर यांनी लॉकडाऊनच्या काळात विविध सामाजिक संघटनासोबत आपली सामाजिक बांधिलकी दाखविली आहे .त्यानी स्वतः हजारो रुपये स्वताच्या पदरातील खर्च करून कोणतीही प्रसिद्धी न करता गुप्त दानाप्रमाणे कोरोनाच्या लढाईत खर्च केले .
 
आज ही त्यांच्या हातून समाजकार्य चालू आहे .याचं समाजकार्याचा भाग म्हणून त्यानी वैतरणा धरण येथील कामगारांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले .सर्व खात्यातील कामगार-कर्मचारी वृंदाकडून संचालक भानुदास भोईर साहेब यांचे हार्दिक आभार मानण्यात आले.