राममंदिर भूमिपूजनाच्या दिवशी ५० मुस्लीम कुटुंबियातील २५० सदस्यांनी स्विकारला हिंदू धर्म!

जनदूत टिम    06-Aug-2020
Total Views |
राजस्थान : राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील मोतीसरा गावांत राहणाऱ्या ५० मुस्लीम कुटुंबियांनी हिंदू धर्म स्विकारला. हिंदू धर्माचे स्वीकार करणारे सुभनराम यांनी सांगितले की, मुघल काळात त्यांच्या पूर्वजांना धमकावून मुस्लीम धर्म स्विकारण्यास भाग पाडले होते. मात्र याबाबत कळल्यानंतर आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला पुन्हा याच धर्मात जायचे आहे, असे ठरवले. त्यानंतर ५० मुस्लीम कुटुंबियांतील २५० सदस्यांनी होम-हवन करून हिंदू धर्माचा स्वीकार केला.
 
Muslim_1  H x W
 
मुख्य म्हणजे संपूर्ण कुटुंब गेल्या वर्षभरापासून हिंदू सण साजरे करत होते. त्यांच्या परिवारातील एका सदस्यानं सांगितले की, त्यांनी कधीच मुस्लीम पद्धतीने सण साजरे केले नाहीत. राममंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधत होम-हवन करून संपूर्ण कुटुंबाने हिंदू धर्माचा स्वीकार केला.
 
या परिवारानं गावच्या संरपंचांना बोलवून हवन केला. त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्या पूर्वजांना जबरदस्ती मुस्लीम धर्माचा स्वीकार करण्यास भाग पाडले होते. मात्र आता घरातील शिक्षित पिढीने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. तसेच, हा निर्णय कोणाच्याही दबावाखाली येऊन घेतला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
या कुटुंबातील सदस्य हरुराम यांनी सांगितले की, सध्या जगावर कोरोनाचे मोठे संकट आहेत. यातच राममंदिराचे भूमिपूजन झाले, या ऐतिहासिक क्षणाने सर्वांना आनंद दिला. आम्हीही घरात दिवे लावून, होम हवन करून हा दिवस साजरा केला. दरम्यान गावचे सरपंड प्रभुराम कलबी यांनी सांगितले की, आम्ही कोणालाही हिंदू धर्मचा स्वीकार करा असं सांगण्यात आलेले नाही आहे. या सर्वांनी स्वत: हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. भारतीय संविधानानुसार कोणतीही व्यक्ती कोणताही धर्म स्वीकारू शकते.