माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना करोनाची लागण, घरातच क्वारंटाइन

जनदूत टिम    26-Aug-2020
Total Views |
सांगलीः रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना करोनाची लागण झाली आहे. इस्लामपूरमधील घरीच त्यांनी सेल्फ क्वारंटाइन केलंय. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येण्याची शक्यता आहे.

Sadabhau_1  H x 
 
शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ खासदारही बाधित झाल्यामुळे चिंता
वाढली आहे.
 
शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यापाठोपाठ शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलालाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईला आणण्यात येत आहे.