तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांचा प्रताप !!!!

17 Aug 2020 14:21:43

प्रशासकिय दिरंगाईचा फटका मुख्यमंत्री सहायता निधीलातिन महीने धनादेश तसे च्या तसेच पडुन

शहापुर : राज्यभरात सध्या कोरोना विषाणुचा प्रदुर्भाव वाढला आहे, त्यात सतत च्या लाँकडाऊन मुळे राज्यातील जनते बरोबरच सरकारची देखील आर्थिक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यातच शहापुर तालुक्यातील सामाजिक संस्था आणी समाजिक कार्यकर्ते सामाजिक भान जपुन मुख्यमंत्री साहायता निधीला सढळ हस्ते मदत केली होती, परंतु या मदतीला ही तहसिलदार निलिमा सुर्यवंशी- थिटे यांच्या प्रशासकिय दिरंगाईचा फटका बसला आसुन मुख्यमंत्री साहायता मदत म्हणुन दिलेले धनादेश तसे च्या तसे पडुन आसल्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीत जमा न झाल्याने मदत करनार्या सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
Vasind Uposhan_1 &nb 
 
महाराष्ट्रासह संपुर्ण जगात सध्या कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव मोठ्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे गेल्या काही महिन्यान संपुर्ण राज्यभरात लाँकडाऊन ची परीस्थिती आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट कोसळले आसतांनाच, राज्य ही मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहे. या संकटावर मात करण्यासाठी आणी मुख्यमंत्री सहायता निधीला मोठ्या प्रमाणात दानशुर दात्यांनी मदत केली आहे. शहापुर तालुक्यातही आनेकांनी या मदत निधीला भरघोस मदत केली आसुन काही सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी संकटकाळी सामाजिक भान जपत शहापुरच्या तहसिलदार निलिमा सुर्यवंशी -थिटे यांनकडे दिपक भांगरथ यांनी मुलाच्या वाढदिवसा निमित्त धनादेशा द्वारे पंधरा हजार रुपये व शहापुर निवासी कुणबी समाज मंडळा तर्फे 1 लाख 31 हजार रुपये येवढी भरघोस मदत केली होती पण या मदतीला ही प्रशासकिय दिरंगाई चा फटका बसला आसुन हे धनादेश जसे च्या तसे पडले आसल्याने हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमाच झाला नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
 
वास्तविक करोनाच्या काळात शासन अर्थिक संकटात आसतांना ही शहापुर च्या तहसिलदारांनी हे धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करने भाग होते, तसेच मदत देनार्यांनी वारंवार सुचना देवुन ही मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा न झाल्याचे शहापुरातल्या पत्रकारांनी सुरु केलेल्या उपोषन स्थळी भेट देवुन ही नाराजी व्यक्त केली आहे.
 
माझ्या मुलाच्या वाढदिवसा निमित मी मुख्यमंत्री सहायता निधीला धनादेशा द्वारे पंधरा हजार रुपयाची मदत दिली होती आज चार महीने झाले आसतांना ही मतद मुख्यमंत्री सहायता निधी कडे जमा झाली नाही, तहसिलदारांना ही बात वेळो वेळी कळवली होती.
दिपक भांगरथ
मदतकर्ता
 
कोवीड काळात शहापुर निवासी कुणबी समाज मंडळाच्या वतीने अनेक दानशुर दात्यांच्या सहभागातुन मुख्यमंत्री सहायता निधी साठी एक लाख एकतीस हजार रुपयांचा धनादेश तहसिलदार यांन कडे दिला होता, पण हा धनादेश अजुनही मुख्यमंत्री साहायता निधीत जमा न झाल्याने,प्रशासनाच्या दिरंगाईचा फटका चांगल्या भावनेतुन केलेल्या मदतीला बसला आहे.
आनिल निचिते
मदतकर्ता
 
Powered By Sangraha 9.0