जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीच्या नावाखाली लाखोंचा निधी हडप

12 Aug 2020 13:08:17

- काम केले, (एनजीओने) पैसे काढले जिल्हा परिषदेने
- ग्रामस्थांची कारवाईची मागणी

जव्हार : जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीचे काम केलं आहे. (वरले पर्सन) या एनजीओने आणि हेच आयते शाळा दुरुस्तीचे काम दाखवून जिल्हा परिषदेने बिल काढल्याचा प्रकार ग्रामस्थ चव्हाट्यावर आणला आहे. त्या भ्रष्ट शाखा अभियंत्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये, म्हणून या अभियंत्याने त्या जि. प.शाळा दुरुस्तीचे काम आठवडा भरापूर्वी तात्काळ करण्यात आले आहे. शाळा दुरुस्तीचा भ्रष्टाचार समोर येऊ नये म्हणून त्या शाखा अभियंत्यांची लोकप्रतिनिधिकडे धावाधाव सुरु आहे. संबंधित जि.प. शाळेच्या दुरुस्तीची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
ZP School_1  H
 
सन-२०१७-१८ यावर्षी जव्हार तालुक्यातील देवगाव जि. प. शाळेची वर्गखोली दुरुस्तीचे काम वरले पर्सन(worley persons) या एनजिओने वर्ग दुरुस्तीचे काम केल्याचे एनजीओने सांगितले. मात्र हे आयतेच दुरुस्तीचे काम दाखवून बिल काढल्याचा प्रकार समोर आला आहे. तर जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता एस.जी.वाघमारे यांनी आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना हे शाळा दुरुस्तीचे काम देऊन, ४ लाख ८० हजार रुपयांचा निधी काढल्याचा प्रकार समोर आला आहे. देवगाव शाळा दुरुस्तीच्या कामांत वर्ग खोलीवर कुठलेच काम करण्यात आले नव्हते, मात्र लाखो रुपयांचा निधी काढला गेला होता.
 
हा प्रकार काही त्या गावातील सुशिक्षित तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी येथील वरिष्ठ नागरिकांना सांगितले. आणि त्यानंतर जव्हार पंचायत समिती बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे. संबधीत प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन त्या भ्रष्ट अभियंत्यावर आणि संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी करीत आहेत. देवगाव शाळा दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा केलेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे त्या अभियंत्यांचे काही ठेकेदार जाऊन त्या गावातील लोकप्रतिनिधींना भेटून गप्प केल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.
 
तसेच ह्या शाळा दुरुस्तीचे काम पावसाळ्यात मध्येच सुरु का केले. परंतु शाळा दुरुस्त न करताच बिल काढल्याचा प्रकार झाला आहे. हे येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर दुरुस्तीचे काम बंद पडले. मात्र तरीही त्या शाखा अभियंत्याने दुसऱ्या ठेकेदाराकडून शाळा दुरुस्तीचे काम कसेबसे पूर्ण करून घेतले. परंतु तरीही ग्रामस्थ या शाळा दुरुस्तीच्या प्रकरणाची चौकशीसाठी स्थानिक आमदार यांच्याकडे हा मुद्दा मांडून त्या भ्रष्ट अभियंत्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाईची मागणी केली
जानार आहे.
 
देवगाव शाळा दुरुस्तीची माहिती देण्यास जिल्हा परिषद टाळाटाळ करीत असून, तेथील ग्रामस्थ या शाळा दुरुस्तीच्या खोट्या काढलेल्या बिला संदर्भात आमदारांकडे जानार असून, त्या अभियंत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. तसेच हा भ्रष्ट शाखा अभियंता हे प्रकरण दढविन्यासाठी लोकप्रतिनिधीकडे धावाधाव सुरु आहे. या भ्रष्ट अभियंत्याने हैदोस मांडला असून, भ्रष्टाचाराचा कळस केल्याचे काही ठेकेदारांकडून गुपित बोलले जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0