सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, करोनामुळे होते अॅडमिट

जनदूत टिम    11-Aug-2020
Total Views |
इंदूर : प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. राहत इंदौरी यांना करोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर अरबिंदो इस्पितळात नेण्यात आलं होतं.
 
Rahat-Indori_1  
 
मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांचं निधन झालं. सध्या संपूर्ण मध्यप्रदेशात दुःखाची लाट पसरली आहे. सर्व राजकारणी आणि कलाकार मंडळी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
 
आज सकाळी त्यांनी स्वतः करोनाची लागण झाल्याने इस्पितळात भरती झाल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले की, 'करोनाची सौम्य लक्षणं दिसल्यानंतर काल करोनाची चाचणी केली. याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी ऑरबिंदो इस्पितळात भरती झालो. मी या आजाराला हरवेन अशी प्रार्थना करा.'