भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांना कोरोना

जनदूत टिम    10-Aug-2020
Total Views |
उस्मानाबाद : समय सारथी भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह त्यांच्या परिवारातील 6 सदस्यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Sujitsingh_1  H 
 
आमदार ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने प्रकृती चांगली आहे. आमदार ठाकूर हे 3 ऑगस्ट पासून बाहेर कोणाच्याही संपर्कात नसून 4 ऑगस्ट रोजी मंगळवारी त्यांनी कुटुंबातील सर्व जणांची रॅपिड टेस्ट केली त्यानंतर RT PCR टेस्ट केली त्यात 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ठाकूर यांच्या परिवारातील आणखी 3 तर संपर्कातील 3 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.