देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याने अपघात, दोघेही सुखरूप

09 Jul 2020 00:22:23
जळगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सुदैवाने हे दोन्ही नेते सुखरुप आहेत. दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या घरी जाताना हा अपघात झाला. 

pravin-darekar-devendra-f
 
मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दिवंगत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या जळगावच्या घरी जात होते. त्याचवेळी गाडीचा ब्रेक फेल झाल्याने त्यांची गाडी समोरच्या गाडीवर आदळली. त्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने या दोघांनाही कोणतीही दुखापत झालेली नाही.
Powered By Sangraha 9.0