शिवसेना नगरसेवकांची पक्षवापस पुन्हा बांधलं ‘शिवबंधन’

जनदूत टिम    08-Jul-2020
Total Views |
मुंबई : पाचही नगरसेवकांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. सर्व नगरसेवक मातोश्रीवर पोहोचले होते. शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पारनेर नगरपालिकेचे पाचही नगरसेवक स्वगृही परतले आहेत. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
 
Shivsena-Parner-Corporato
 
यानंतर शिवेसना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला होता. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली असल्याचं बोललं जात आहे. मिलिंद नार्वेकर यांच्यासह पाचही नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी जवळपास २० मिनिटं चर्चा केली.