अधिवेशनकाळात काम करीत असताना स्वीय्य सहाय्यकांनाही 30 लाखाची हमी द्यावी

जनदूत टिम    08-Jul-2020
Total Views |

- नाना पटोले साहेब, अध्यक्ष - महाराष्ट विधानसभा, विधानभवन,मुंबई

मुंबई : सद्यस्थितीत मुंबईत कोरोनाचा आकडा 85 हजार तर मृत्युचा आकडा 4000आणि महाराष्टाचा आकडा 2 लाखाच्यावर तर मृत्युचा आकडा गेला आहे.मुंबई शहरात कोरोनाने कहर केला असुन मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे.
 
Nana Patole 2_1 &nbs
 
अशा परिस्थितीतदि.3 आॅगस्ट पासुन महाराष्ट विधानसभेचे सत्र सुरु होत आहे.याकरिताआमंदाराच्या स्वीय सचिवांनी आॅनलाईन तारांकित प्रश्न आणि ठराव सादर केले आहेत. मुबंईत कोरोनाची स्थिती भयंकर असुन अशा स्थितीत स्वीय सचिवांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागणार आहे.त्यांना करोनाची लागण झाल्यास सदर सचिव व त्यांचे कुटुंब उध्वस्थ होण्याचा धोका आहे.
शिवाय सदर स्वीय सचिव हे मा.आमदांराच्या नियुक्तीने तात्पुरत्या पदावर काम करीत असतात.विधानसभे तर्फे त्यांना स्वीय सहाय्यक सचिंवाचे ओळख पत्र देण्यात येते पंरतु या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही सुविधा देण्यात येत नाही.
 
करोना संकट काळात अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या सरकारी कर्मचारी यांना शासनाने 50 लाख रुपये तर नुकताच वीज वितरण कर्मचार्‍यांना 30 लाख रुपये विमा जाहिर केला आहे. याच धरतीवर महाराष्ट विधानसभेने आमंदाराच्या स्वीय सहाय्यक सचिवांना किमान 30 लाख रुपये विमा देण्यात यावा यामुळे या सचिवांच्या कुंटुबांस सुरक्षा प्राप्त होण्यास मदत होईल.
स्वीय्य सचिव यांची स्थिती जगार हमी कामगारांपेक्षाही विदारक आहे.आमदांराकडे काम करीत असताना त्यांना विधानसभेकडून वेतना व्यतिरिक्त कोणतीही शासकीय सुविधा देण्यात येत नाही.ना भविष्य निर्वाह निधी, ना नोकरीची हमी,ना इतर देय्य भत्ते, वर्षानु वर्षे विविध आमदांराकडे काम करुनही नोकरीची कोणतीही हमी नाही.आमंदारांनी नोकरीवरुन काढले की अन्य आमंदारांकडे नोकरी शोधावी लागते.म्हणुनच रोहयोत काम करणारा कामगार हा स्वीय्य सचिवांपेक्षा श्रेष्ठ आहे,या कामगाराने वर्षभर काम केल्यावर रजिस्ट वहीत नोंद झाल्यावर त्यांस सेवेत घेण्यात त्यास शासकीय सेवेचे सर्व लाभ मिळतात.
 
vidhan-bhavan_1 &nbs
 
परंतु आमदांराच्या सचिवांना नोकरीत हमी व सरंक्षण आणि भविष्याची तरतुद करणेबाबत गेले 60 वर्षापासुन आता पर्यंत सत्तेत असलेल्या कोणत्याही सरकारने केले नाही.नाही या गंभीर समस्येकडे लक्ष दिले.हे खेदाने नमुद करावेसे वाटत आहे. काही आमदार आपल्या सचिवाची भविष्याची तरतूद करुन त्यांचे पुनर्वसन करतात पंरतु अशा आमंदारांची संख्या खुपच कमी आहे.तशी कायद्यात कोणतीही तरतूद नाही .हे आमंदारांच्या ईच्छेवर अवलंबुन आहे.पंरतु विधान सभेत काम करणारे सुमारे 80टक्के स्वीय सचिव हलाखीचे जीवन जगत आहेत ही वस्तुस्थिती आहे.
नुकतेच दि.7-7-2020 रोजी आमचे बरोबर काम करणारे आमचे सहकारी श्री कमलेश कोळी यांचे निधन झाले.त्यांच्या कुटुंबात आई ,पत्नी,दोन लहान मुली असा परिवार आहे.पंरतु त्यांच्या परीवारास भविष्य निधी,अशी कोणतीही तरतूद नसल्याने कमलेश सारखी अनेक कुंटुबे भविष्यातील तरतूदी अभावी उघडी पडून उध्वस्त होत आहे.ही विदारक व दुखःदायक वस्तुस्थिती आहे.पी.ए.यांना कोणी वालीच नाही ,कामापुरता उपयोग करुन घ्यायचा आणि नंतर वार्‍यावर सोडून द्यायचे यामुळेच या क्षेत्रात येण्याचे कुणीच धाडस करत नाही.ही खतआहे.भविष्याची तरतूदच नसेल तर कोण येणार.
 
महाराष्ट विधानसभेत आमंदारांचे स्वीय सहाय्यक पदावर काम करणारे तरुणांची स्थिती ना घरका ना घाटका अशी स्थिती झाली आहे. शासनास विनंती आहे की विधान सभेत काम करणार्‍या स्वीय्य सचिवांना करोना संकटकाळात सत्रात काम करीत असताना त्यांना 30 लाख रुपये विमा संरक्षण देणे व अन्य महत्वपूर्ण मागण्यांवर गांभीर्यांने विचार करुन निर्णय घ्यावा व स्वीय सचिवांचे पुनर्वसन करणेबाब विचार व्हावा अशी स्वीय सहायक संघाकडून विनंती करण्यात आली आहे.