स्टेशनवर मताची भीक मागणारे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे उपनगरीय रेल्वे प्रवास करणारे सरकारी नोकरदार मेटाकुटीला

07 Jul 2020 21:42:48
कल्याण : गेले तीन महिने प्रचंड त्रास सहन करून कोरोना सारख्या महामारीत दररोज आपल्या कर्तव्याला महत्व देऊन घराबाहेर पडणाऱ्या आणि अक्षरशः मेटाकुटीला आलेल्या सरकारी नोकरदार वर्गाला खाजगी गाडी चा प्रवास करून झाला.
 
Train_1  H x W:
 
सरकारी बसने प्रवास झाला. आता लोकल सुरु केल्या आहेत. मात्र या लोकल प्रवासाने प्रचंड मानसिक त्रास सहन करत हा प्रवास करीत आहेत. त्यामुळे सदर लोकल बंद होत्या त्याच बऱ्या होत्या असा संताप व्यक्त होत आहेत. यामध्ये निवडणुकीत मतांची भीक मागणारे लोकप्रतिनिधी च्या दुर्लक्षामुळे रेल्वे प्रशासन पुरेश्या लोकल गाड्या आणि सर्व स्टेशनवर थांबे देऊ शकली नाही. त्याचबरोबर प्रवाशी सेवेच्या नावाने टेम्भा मिरवणारे प्रवाशी संघटनेवाले याबाबत कुठे गायब झालेत असा सवाल विचारला जात आहे.
प्रत्येक निवडणूक आली कि मतदाराला विनवणी करून मताची भीक मागायला रेल्वे स्टेशनवर येणारे खासदार आणि आमदारांनी या कोरोनाच्या काळात जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला धावून येण्याची गरज होती. परंतु या प्रवाशांच्या सोयीसाठी गेल्यानंतर कोणतेही कमिशन मिळत नसल्याने ठेकेदारीत मश्गुल असलेल्या या राजकारण्यांनी रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी जाण्याचे टाळत असल्याचे बोलले जात आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचेपदाधिकारी हे फक्त आपल्याला सवलती मिळाव्यात याच उद्देशाने काम करत आहेत का? असे प्रवाशांकडून विचारले जात आहे. तसेच आपला प्रवासी हा वेळेवर कामावर पोहोचेल कि नाही, हि खबरदारी संघठनेवाले घेत नाहीत.
 
त्यामुळे प्रवाशांना आज कोणाचाही आधार नसल्याची भावना निर्माण झाली आहे. मुंबई ते कर्जत आणि कसारा कडे जाणाऱ्या लोकल गाडयांना सर्व स्टेशनांवर थांबे देण्यात यावेत. गाड्यांच्या वेळेमध्ये सुसूत्रता आणण्यात यावी. तसेच आता सर्वच शासकीय कर्मचारी प्रवास करीत असल्याने लोकल गाड्यांची संख्या वाढविण्यात याव्यात. या किरकोळ मागण्या त्याठिकाणच्या प्रवाशांच्या सोडविण्यात सर्वच यंत्रणा कमी पडत आहे.
 
राजकीय पक्ष आणि त्यांचे लोकप्रतिनिधींच्या बेपर्वा धोरणामुळे तसेच रेल्वे समस्येवर बोलणारी प्रवाशी संघटना यांच्या कडून सोयी सुविधांच्या बाबतचे कोणतेच सहकार्य न मिळणाऱ्या कोरोना काळात प्रचंड जिद्दीने काम करणारे सरकारी नोकरदार वर्ग आणि सर्व प्रकारचा आरोग्य आणि बँक कर्मचारी यांच्या किरकोळ मागण्याचा पाठपुरावा होणे अपेक्षित होते तो यांनी केलेला नाही. त्यामुळे फलाटावर मत मागायला आलेला पुढारी आणि शायनिंग प्रवाशी संघटनेवाले यांच्या विरोधात प्रचंड असंतोष वाढला आहे.
Powered By Sangraha 9.0