भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सुरेखा थेतले सदस्यपदी तर हरिश्चंद्र भोये यांची निमंत्रित सदस्यपदी निवड

06 Jul 2020 20:38:04
जव्हार : नुकतीच महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश कार्यकारिणी घोषित केली असून यामध्ये जव्हार तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिचंद्र भोये व युवा नेत्या सुरेखा थेतले यांची निवड करण्यात आली आहे.
 
Surekha_1  H x
 
सुरेखा थेतले यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून तर आणि हरिश्चंद्र भोये यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सुरेखा थेतले यांनी 2007 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केलेला असून त्या जव्हार तालुक्यातील वडपाडा जामसर येथील रहिवासी आहेत, प्रथम त्या ठाणे जिल्हा परिषदेत सदस्य त्यानंतर पालघर जिल्हा परिषदेत दोन वेळा सदस्य निवडून आलेले आहेत.
 
सध्या त्या पालघर जिल्हा परिषदेत भाजपचे गटनेत्या असून पालघर जिल्हा परिषदेच्या प्रथम अध्यक्षाही राहिल्या आहेत तसेच हरिचंद्र भोये यापूर्वी महाराष्ट्र भाजपा अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष होते तसेच जव्हार आदिवासी प्रकल्प कार्यालयचे समितीचेही ते अध्यक्ष आहेत,भोये व थेतले यांनी ग्रामीण भागात भाजपा वर्चस्व वाढवण्यासाठी योगदान दिले आहे. सुरेखा थेतले व हरिश्चंद्र भोये यांची निवड केल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त होत असून परिसरात त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
Powered By Sangraha 9.0