जव्हार मधील पर्यटन स्थळांची सुरक्षा वाऱ्यावर

पारस सहाणे    06-Jul-2020
Total Views |

- घटना घडल्या नंतर प्रशासनाला आली जाग, जव्हारची पर्यटन स्थळे उपेक्षित, येणारा निधी जातो तरी कुठे
- धबधबा पर्यटनस्थळी डोहाची स्थिती, अपघाती क्षेत्र, माहिती फलक लावण

जव्हार : जव्हारपासून अवघ्या ७ कि.मी अंतरावर असलेल्या (काळशेती) नदीवरील काळमांडवी धबधब्यावर फिरायला गेलेल्या जव्हार मधील २ तरुण पाय घसरून पडाले, तर त्यांना वाचवायला गेलेल्या ३ तरुण असे ५ तरुणांचा धबधबा खोल डोहात पडून बुडाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. या घटनेमुळे दुःखत हळहळ व्यक्त होत आहे. 
 
javhar_1  H x W
काळमांडवी धबधब्यात जवळपास फिरतांना पर्यटकांसाठी अत्यंत धोक्कादायक असून, खोलदरी आहे. या धबधब्याच्या डोहात पडल्यानंतर चोहुबाजूने खडकाळ आणि संपूर्ण उतराचा भाग असल्याने त्या दुदैवी मृत्यू पावलेल्या तरुणांना पाच तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे..
 
पालघर जिल्ह्यातील जव्हार हे महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते पर्यटन बाबतीत गेली कित्येक वर्षे येथे विकासाची चर्चा सुरू आहे गेल्या काही वर्षात शासनाने याकडे लक्ष दिलेले असून जव्हार तालुक्यातील पर्यटन स्थळे विकासासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये शासन देत आहे तेथे तसेच पर्यटन विकासाच्या नावाखाली बांधकाम विभाग पेव्हर ब्लॉक लावून पर्यटन स्थळाचा विकास होत आहे असे दर्शविते.
 
तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी नेहमी निवडणुकांमध्ये राजकारण होत असते विविध पक्षांच्या जाहीरनाम्यात जव्हार तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास करून तेथे स्थानिक स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असे गोंडस प्रसार केला जातो ,कित्येक सरकार गेली मात्र अजून जव्हारचा पर्यटन विकास झालेला दिसत नाहीत, केवळ रस्ते करून पर्यटन स्थळे विकसित होणार नसून येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा देणे गरजेचे आहे वास्तविक पाहता पर्यटक घेतात ते कोणाच्या भरोशावर समजत नाही त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा उपलब्ध होत नाही महिलांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र दालने असो किंवा धबधबे स्थळी सुरक्षा व्यवस्थापन असो आजपर्यंतचे की अशी एकी ही गोष्ट झालेली दिसत नाहीत.
 
निधी जातो तरी कुठे..?
जव्हार तालुक्यातील पर्यटन स्थळे विकास करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपये हे पर्यटन विकास या नावाखाली जव्हार तालुक्यात देत असते मात्र हा निधी जातो तरी कुठे असा प्रश्न पडतो.
 
घटना घडल्यानंतर प्रशासन करते उपाययोजना-
जव्हार शहरातील 5 तरुण मृत्युमुखी पडल्यानंतर स्थानिक प्रशासन जागे झाले ,काळमांडवी धबधब्याच्या प्रवेशद्वारावर प्रवेश बंदीचे फलक लावण्यात आला.
 
जिल्हाधिकारी यांनी 12 जुन लाच मनाई आदेश काढला होता
मात्र तरीदेखील जव्हार तालुक्यातील स्थानिक प्रशासनाने अंमलबजावणी केली नसल्याने सदर दुर्दैवी घटना घडली, वेळीच अंमलबजावणी केली असती तर आज घटना घडली नसती,
 
धबधब्यावर पार्ट्या
जव्हार शहर १ जुलै पासून पूर्णपणे बंद करण्यात आल्याने, धबधब्यांवर बंदी असतांनाही आले कसे? तसेच या धबधब्यावर गेल्या, आठवडा भरापासून ह्या काळमांडवी धबधबा पर्यटनस्थळी येऊन काही तरुण पार्टी करत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगीतले.
तसेच त्या ठिकाणी अजून काही तरुणांनी सलग पार्ट्या होत होत्या. मात्र याकडे ग्रामपंचायत स्तरावर अन्य प्रशासनाने प्रसंगावधान असणे गरजेचे होते. किंवा त्या ठिकाणी धोकादायक आहे असे फलक लावणे गरजेचे हो, तसेच मागील पाच वर्षापूर्वी गुजरात येथील २ तरुण आणि १ तरुणीचा असा तिघांचा दाबोसा धबधब्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तसेच जव्हार तालुक्यातील पावसाळ्यात धबधब्यांवर दरवर्षी असा अनेक लहान मोठ्या घटना घडल्या आहेत, म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.
 
ग्रामपंचायतीला सुचले शहाणपण
काळमांडवी धबधबा हा आपटाळे ग्रामपंचयात हद्दीत येत आहे. मात्र हा "काळमांडवी धबधबा" धोक्कादायक आहे. असे ग्रामपंचयातीने कुठलेही बोर्ड, किंवा नाम फलक लावण्यात आले नव्हते. तसेच काळमांडवी धबधब्याचा डोह किती खोल आहे. यांचाही बोर्ड लावणे बंधनकारक होते. म्हणजेच पर्यटकांनी सावधगिरी बाळगली असती, असा घटना घडल्या नसत्या, असेही बोलले जात आहे. तसेच पर्यटक घसरून पडल्याच्या पूर्वी असा अनेक घटना घडल्या आहेत. याकडे गांभीर्य पूर्वक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. या पाच तरुणांच्या दुदैवी मृत्यूनंतर प्रशासनाने प्रसंगसावध राहणे गरजेचे होते मात्र घटना घडल्या नंतर प्रवेश बंदीची फलक लावण्यात आले आहे.
 
धबधबा पर्यटनस्थळी विकास कामे
सेलवास रोडवरील दाभोसा धबधब्याकडे जाणाऱ्या जाणारा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने रुंदीकरण केलेला आहे तसेच धबधबा बघण्यासाठी काँक्रीट व तिथे सुरक्षितता म्हणून रेलिंग केलेली आहे मात्र दाभोसा धबधबा बघण्यासाठी खाली उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्या पावसात वाहून गगेलेल्या आहेत तिथे खाली जाण्यासाठी योग्य व्यवस्था नाही
दाभोसा धबधबा धोकादायक आहे तसेच काळ मांडवी धबधब्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची व अन्य कामे केली आहेत. मात्र त्या ठिकाणी जाण्यासाठी अजूनही रस्त्याची अवस्था बिकट आहे. बांधकाम विभागाने केलेले रस्त्याचे कामे अर्धवट असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच काळमांडवी हा धबधबा हा वन विभागाच्या क्षेत्रात येत आहे. मात्र वन विभागाने त्या ठिकाणी अजून कुठलेही विकास काम केलं नसल्याचे वन विभागाने सांगितले.
 
पर्यटनस्थळावर बंदी
जव्हार शहरातील काळमांडवी धबधबा, दाबोसा धबधबा, भोपतगड, दादरकोपरा धबधबा, सनसेंट पॉईंट, हनुमान पॉईंट, राजवाडा जय विजय पॅलेस, या पर्यटनस्थळावर बंदी असतांनाही लपून छपुन हे पर्यटक येतात तरी कसे? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बंदी असतांनाही त्या पर्यटन ठिकाणी जेवण, दारू पार्सल नेऊन पार्ट्या, केल्या जात आहेत. याकडे आतातरी या पाच तरुणांच्या मृत्यूच्या घटनेनंतर अन्य पर्यटक धडा घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
 
पर्यटकांची सुरक्षा
जव्हार तालुक्यात छोटे-मोठे खूप धबधबे आहेत त्यामध्ये दाबोसा धबधबा ,हिरड पाडा धबधबा ,काळमांडवी धबधबा या धबधब्यांवर पर्यटक येतात व खोल दरी खाली उतरून धबधब्याजवळ जातात बाहेर गावच्या पर्यटकांना या पाण्याचा अंदाज नसतो त्यामुळे या पर्यटनस्थळी दोरखंड, ट्यूब, सेफ्टी जॅकेट उपलब्ध असणे गरजेचे आहे. काही पर्यटन आयोजन करणारी संस्था कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता पर्यटन सहल जव्हार आयोजित येथे करतात मात्र पर्यटनासाठी येणाऱ्या कुठल्याही पर्यटकाची सुरक्षा घेतली जात नसल्याचे दिसते त्यामुळे त्यांची सुरक्षा न घेता पर्यटन आयोजन करणे खूप धोकादायक ठरू शकते.
 
पर्यटनस्थळी या पूर्वीच्या अपघातग्रस्तांचा बोर्ड लावणे गरजेच
जव्हार हा उंच भाग असल्याने, सर्वत्र द-याखो-यातुन धबधबे पडतांना दिसत आहेत. मात्र ज्या ठिकाणी पर्यटकस्थळी धबधब्यांवर पर्यटक येतात, त्या पर्यटन स्थळी सुरक्षाच्या दृष्टीने बॅनर तसेच त्या ठिकाणी यापूर्वी ज्यांचे अपघात होऊन, मृत्यू झाले आहेत. किंवा ज्या पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. असा मृत्यूंची नोंद त्या बोर्डावर माहिती लावणे बंधनकारक आहे. कारण यानंतर पर्यटनस्थळी येना-या पर्यटकांना तरी कळेल कि हे पर्यटनस्थळ धोकादायक भाग आहे. म्हणून यापूर्वी एवढ्या लोकांचे अपघातात मृत्यू झाला आहे. हे वाचून तरी नवीन येणारे पर्यटक तरी घाबरून त्या खोल डोहात उतरणार नाहीत, काळजी घेतील असे काही जाणकार नागरिकांनी सांगितले..
जव्हार येथील काळमांडवी धबधब्याची दुर्घटना दुःखद आहे
पावसाळयात पालघर जिल्हयामध्ये असलेले धबधबे, तलाव, धरणे, किल्ले व समुद्र किनारी या ठिकाणी मोठया प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी आल्याने गर्दी होण्याची व सामासिक अंतर राखले न जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी होऊ नये म्हणून दि.१२/०६/२०२० रोजीच्या आदेशान्वये सर्व नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करतो
- डॉ कैलास शिंदे, जिल्हाधिकारी, पालघर