तहसीलदारांना पाठीशी घालण्याचे सरकारचे प्रयत्न

जनदूत टिम    05-Jul-2020
Total Views |

- शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या पत्राची दोन महिन्या नंतरही मंत्र्यांकडून दखल नाही संतापजन प्रकार उजेडात जेष्ठ आमदाराची मंत्र्यांकडून होतेय अवहेलना

ठाणे : तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख निलीमा सुर्यवंशी यांची तत्काळ बदली करावी अशी मागणी शहापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा यांनी सरकार मधील राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाडीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचेराज्याचे नेते व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे ३ मे रोजी एका लेखी निवेदनाद्वारे केली होती.
 
Daroda_1  H x W
 
आमदार दरोडा यांच्या तक्रारीला जवळपास दोन महिने होत आले तरी अध्यापही आमदारांच्या तक्रारीची दखल सरकार मधील मंत्र्यांकडून गांभीर्याने घेण्यात न आल्याने मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे.राष्ट्रवादी पक्षातील सत्तेतील एका जेष्ठ आदारांच्या पत्राला मंत्र्यांनी चक्क केराची टोपली दाखविली काय ? अशी उलटसुलट चर्चा सध्या शहापूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील नागरिकांत सुरु आहे. एकिकडे राज्यातील मोठ्या महानगरपालिकांतील आयुक्तांच्या बदल्यांचा सिलसिला सरकारकडून सुरु असताना दुसरीकडे आदिवासी बहुल शहापूर तालुक्याच्या तहसीलदारच्या बदली संदर्भात केलेल्या सत्ताधारी आमदारांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करुन सरकार मधीलच मंत्र्यांकडून तहसीलदारांना अभय देण्याचा प्रकार ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यात दिसत आहे.
 
एका लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची दोन महिन्यानंतरही गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही. हे संतापजन असे आहे. या मागचे गुढ रहस्य मात्र गुलदस्त्यात असून जिल्हयातील एका मंत्र्यांला हाताशी धरुन ही बदली तक्रार दडपण्याचा प्रकार शहापूरात सुरु असल्याची चर्चा नागरिकांत आहे.तर दुसरीकडे दोन महिने होत आले तरी अध्यापही तहसीलदारांची आमदारांच्या तक्रारीनंतरही शहापूर येथून अन्यत्र बदली होऊ शकली नसल्याने आमदार दौलत दरोडा यांच्या पत्राची सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून दखल घेतली नसल्याचे स्पष्ट होत आहे.बदली तर सोडाच परंतु आमदारांच्या तक्रारी नंतर तहसीलदारांची साधी चौकशी देखील सरकार मधील मंत्र्यांनी लावली नसल्याने तहसीलदारांना पाठीशी घालण्याचे काम मंत्र्यांकडून सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
तहसीलदारांच्या बदलीसाठी एका राष्ट्रवादीच्या जेष्ठ आमदाराला सरकार मध्ये सत्तेत असूनही संघर्ष करावा लागतो आहे.आमदार दरोडा यांची सरकार मधीललच मित्र पक्षातील काही मंत्र्यांकडून एक प्रकारे अवेहलना सुरु असून हे तितकेच संतापजन असे चित्र दिसत आहे.आमदार दरोडा यांनी तहसीलदारांच्या बदली प्रकरणाची तक्रार माघे घेतली की काय?अशी देखील चर्चा दबक्या आवाजात तालुक्यात सुरु असल्याचे दिसत आहे. या नागरिकांच्या चर्चेनंतर आमदार दरोडा यांनी तहसीलदारांची बदली न झाल्यास वेळ पडल्यास उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे. विधीमंडळातील एका जेष्ठ आमदाराच्या तक्रारीची दखल होत नसेल तर सामान्य माणसांच्या तक्रारीची कोण दखल घेणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.या सर्व प्रकाराने शहापूर तालुक्यातील नागरिकांत मात्र कमालीचा संताप व्यक्त होत आहे.
 
बदली रोखण्यासाठी दलालांचा एक गट सक्रीय - आमदार दरोडांच्या तक्रारीनंतरही तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांची बदली होऊ नये म्हणून तहसीलदार कार्यालयात दलाली करणारे काही दलाल,राजकीय पुढारी कम आणि ठेकेदार ,बिल्डर ,शासनाच्या गौण खनिजाची लुट करणारे व रॉयल्टी बुडविणारे रेतीचोर, दगडचोर,मातीचोर,हे सक्रीय झाले असून तहसीलदारांच्या बदली प्रकरणी स्थानिक पातळीवर या मंडळींनी राजकारण सुरु केले असून केवळ चोरी लबाडीसाठी व आपल्या अर्थीक फायद्यासाठी दलालांनी शहापूर आपत्ती व्यवस्थापनाचे काम हाताळण्यात फेल ठरलेल्या व तालुक्यातील सामान्य गोरगरीब जनतेशी ,लोकप्रतिनिधींशी मुजोरपणे वागणाऱ्या,गौण खनिज चोरांना पाठीशी घालणाऱ्या व आपल्या मनमानीपणे एकाधिकारशाहीने दंडेलशाही पध्दतीने तालुक्याचा कारभार चालविणाऱ्या भ्रष्टाचारी ,लाचखोर तहसीलदार निलीमा सूर्यवंशी यांची बदली रोखण्यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत.
शहापूर तहसीलदारांच्या बदली संदर्भात मी केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा माझा मंत्रालयात सुरु असून शहापूर तहसीलदारांची अन्यत्र बदली करण्याची कारवाई लवकरच होईल यामुळे मला बदलीसाठी आता उपोषण करावे लागणार नाही .
- दौलत दरोडा, आमदार, शहापूर विधानसभा