औरंगाबादची रोगप्रतिकारक बूस्टर बहुगुणी डाळिंबे ठाण्यात

05 Jul 2020 10:51:15
ठाणे: डाळींब सर्वात सामर्थ्यवान रोगप्रतिकारक बूस्टर बहुगुणी प्रसिद्ध फळ आहे.औरंगाबाद जि. मौजे सायगव्हान ता.कन्नड येथील सुयश अॅग्रो बागेतील गोड ,गुलाबी डाळिंब आकर्षक जाळीदार पिशवीत पॅकिंग करुन ठाण्यात येत आहेत.
 
Pomegranates_1  
 
डाळींब व्यवसायचा प्रसार, प्रचार व्हावा अडत दलालांच्या विळख्यात अडकलेल्या डाळींब व्यवसायाला अधिक चालना मिळावी शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी सुयश अॅग्रोने पुढाकार घेतला असून "कृषी कन्या" वाहना मार्फत विक्री करण्यात येणार आहे. शेतकऱ्याच्या बांधावरून. ठाणे शहरात प्रत्येक सोसायटीत थेट डाळींब देण्याचा संकल्प यावेळी शेतकरी बांधवानी केला.यासाठी शेतकरी ते ग्राहक तत्त्वावर काम करणाऱ्यांना गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतीमाल रास्त दरात विकत घेण्याची यंत्रणा उभी करावी अशी मागणी होत आहे.
 
डाळिंब या फळामध्ये असलेल्या अन्नऔषधी गुणधर्मामुळे ग्राहकांचे सामाजिक आरोग्य सदृढ राहण्यास मदत होणार आहे. यामुळे बाजारपेठेत येत्या काळात डाळिंबांना मागणी वाढणार आहे. लॉकडाऊन काळात सुयश अॅग्रो माध्यमातून अनेक तरुण तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
सुयश अॅग्रो: ७७१००८५३३०, ९८२०५४५०१९
Powered By Sangraha 9.0