महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहराच्या संघर्षाला यश

04 Jul 2020 01:15:32
मुरबाड : मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठ ते बस स्थानक येथील विजेचे पोल धोकादायक असल्याचे सांगत मनसेने सदर पोल रस्त्याच्या माधोमध न ठेवता रस्त्याच्या कडेला लावण्याबाबत पत्र व्यवहार करत नगरपंचायत विरोधात आंदोलन व पाठपुरावा केला होता. सदर विजेच्या पोलला शहरातील अनेक दुचाकीस्वार धडकुन जखमी झाले तसे त्यांचा वाहनांचा ही नुकसान झाले होते. तसेच चुकीच्या ठिकाणी बसवलेल्या पोल मुळे शहरात सतत वहातुकीची कोंडी होत असल्याने मुरबाड़करांना रोज अनेक अडचणीना सामोरे जावे लागत असल्याने अनेक मुरबाड़करानी मनसेकड़े ह्याबाबत तक्रार केली होती.
 
Poal MNs Murbad_1 &n
 
जोपर्यंत धोकादायक पोल हटणार नाहीत तोपर्यंत मनसे स्वस्थ बसणार नाही हा शब्द मनसेने मुरबाडकरांना दिला होता. सदर विषय मनसेने हाती घेउन निवेदन-आंदोलन-पाठपुरावा केला यामध्ये मनसे ने नगरपंचायत प्रशासन तक्रारी ची दखल घेत नसल्याने नगरपंचायत तात्कलीन मुख्यधिकारी भुसे यांची खुर्ची रस्त्यावर आणली होती. त्यानंतर ही राजकिय दबावा पोटी व श्रेयवादा मुळे पुन्हा उडवा उडवीची उत्तरे मिळाली तरीही मनसे ने हार न मानता संघर्ष सुरुच ठेवला. पुन्हा आंदोलनचा इशारा देऊन नगर पंचायत कार्यालयाच्या समोरील मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. त्यावेळी सुद्धा लेखी आश्वासन देऊन वरील कारणाने कारवाई करण्यात टाळाटाळ करण्यात आली. पण तरीही मनसे चा धोकदायक पोल हाटवा यासाठी संघर्षमय पाठपुरावा सुरुच होता.
 
शेवटी पुन्हा एखदा मार्च २०२० ला उपोषणाचा इशारा दिल्या नंतर नगरपंचायत प्रशासनाने चर्चेस बोलवुन १० दिवसात सदर धोकादायक विजेचे खांब काढण्यात बाबत ठराव घेऊन तात्काल सदर खांब काढण्याबाबत कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले, मात्र सदर काम हे मनसेला लेखी आश्वासन मिळून देखील लॉक डाउन असल्याने वेळेत सुरु न होता २ महीने उशीरा सुरु झाले असले व निवेदन-आंदोलन-आश्वासन ते मनसेच्या दीर्घ संघर्षानंतर जरी पूर्ण होत असले तरी मनसेने नगरपंचायत मुरबाड़ चे आभार मानले आहेत. तसेच आज मुरबाडकरांना दिलेला शब्द आज मनसेने पुर्ण करुन दाखवला.
 
मनसे मुरबाड़ शहराने आजपर्यंत कोणतेही आंदोलन अर्ध्यात सोडल नसुन जे विषय हाती घेतले ते तडीस लावले आहेत. सदर आंदोलन नरेशजी देसले (शहर अध्यक्ष-मनसे) यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले असुन मनसेच्या प्रत्येक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांचा व मुरबाड़करांचा हा विजय आहे. तसेच आमच्या आंदोलनांना वेळोवेळी प्रसिध्दी देणाऱ्या सर्व पत्रकार मित्रांचे आभार मानत असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना तुषार म्हसे (सचिव मुरबाड़ शहर) यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0