आदिवासी बांधवांना मिळतोय करटुले मधून आर्थिक आधार

पारस सहाणे    30-Jul-2020
Total Views |
जव्हार : मार्च महिन्यापासून टाळेबंदी असल्याने सर्व वर्गातील नागरिकांना त्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. हातावर पोट असणाऱ्यांही यांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत जव्हार ग्रामीण भागातही कोरोनाची मोठी झळ बसली असून ग्रामीण भागातील जंगलामधील रान भाज्या तसेच रानफळे विकून उदरनिर्वाह करणारे आदिवासी बांधवांना आर्थिक फटका बसला आहे.
 
Ranti Bhaji_1  
 
रानातून भाज्या-फळे काढून त्या शहरी भागात विकल्यास दिवसाला दोनशे तीनशे रुपये आर्थिक फायदा होतो मात्र टाळेबंदी मुळे त्यांचा हा व्यवसाय ठप्प झाला आहे. उन्हाळ्यात रानफळे तसे रानभाज्या मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव रानातून शोधून आणून त्या शहरी भागात विकतात त्यामुळे रानातील चांगल्या प्रतीच्या आयुर्वेदिक शरीराला उत्तम स्वास्थ्य देणाऱ्या भाज्या व फळे नागरिकांना खायला मिळतात. या रान भाज्यांमध्ये करटुले नामक एक भाजी असून ती भाजी शरीरासाठी अत्यंत चांगली आहे उन्हाळा संपला की पावसाळा चालू होतो.
 
सर्वत्र पावसाळी भाज्या या ग्रामीण भागात विकण्यास येतात त्यामध्ये प्रमुख भाज्यांमध्ये करटोली किंवा करटुले अत्यंत पौष्टीक अशी मौसमी भाजी आहे तिला पाहुनी भाजी ही म्हणतात कारण की फक्त पावसाळ्यातच येते आणि वर्षभर मात्र ती गायब असते पावसाळ्यात ती खाल्ल्यानंतर संपूर्ण वर्षभराची उत्तम स्वास्थ्याचे बेगमी करून ठेवायची असते असे सांगतात
कॅन्सर ,हृदयरोग ,मधुमेह, मुळव्याध यावर सदर भाजी लाभदायक आहे.
 
सदर भाजी पावसाळ्यात रानात उत्पन्न होते त्यानंतर आदिवासी बांधव सदर भाजी शहरी भागात विकतात सदर भाजी रानात मिळते मात्र काही प्रगत शेतकऱ्यांनी करटुलेची शेती ही केलेली आहे. मात्र सदर भाजी जव्हार भागात रानात मिळते, खूप कष्ट घेऊन भाजी तोडून आणतात व करटोली भाजी दोनशे ते अडीचशे अश्या रुपये किलो या भावाने विकतात. या भाजीला बाजारात प्रचंड मागणी असते एकंदरीत आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगली पौष्टीक व लाभदायी असलेली भाजी पावसाळ्यात प्रत्येकाने खावी असे आदिवासी बांधव सांगतात.
 
कारण ही भाजी खाल्ल्याने शरीर सुदृढ राहते तसेच कोरोना सारख्या या आजारात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सदर भाजी मदत करते. करटोलीची शेती केल्यास आदिवासी बांधवांना आणखी नफा मिळेल व आर्थिक आधार ही भेटेल कृषी विभागाने जव्हार भागातील शेतकऱ्यांना करटुलेची शेती करण्याचे प्रशिक्षण दिल्यास आदिवासी बांधवांना करचांगले उत्पन्न मिळवून देईल यात शंका नाही