जव्हार मध्ये वीज बिलांबाबत संभ्रम, महावितरण करत आहे शंकांचे निरासन

पारस सहाणे    30-Jul-2020
Total Views |
जव्हार : सध्या महाराष्ट्रातील विविध लोकप्रतिनिधींकडुन सामान्य नागरिकांचे वीज बिल माफ करण्याबाबत मागणी होत असताना जव्हार मधील नागरिकांना लॉकडाऊनच्या आधीच्या काळाच्या तुलनेत अधिक रुपयांची विज बिल जून महिन्याची प्राप्त झाल्याने नागरिक गोंधळून गेले असून गेले असुन जव्हार मधील नागरिकांनी जव्हार वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात एकच गर्दी केली असून व वीज अधिकारी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत आहेत. नागरिक संभ्रमात पडले असून तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.
 
POwer_1  H x W:
 
याबाबत मात्र वीज वितरण कंपनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की लॉक डाऊन च्या काळात कंटेनमेंट झोन असल्याने तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ग्राहकांच्या घरी जाऊन मीटर रिडींग घेणे शक्य नसल्याने ग्राहकांना जून महिन्याचे एकूण चार महिन्याचे बिल ग्राहकांना दिले आहेत.
 
त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अधिक बिल आकारण्यात आलेले नसून ग्राहकांना योग्य बिले पाठवण्यात आले आहेत तसेच ग्राहकांना तीन हफ्तात बिल भरण्याची मुभा देण्यात आली आहे असे महावितरण विभागाने सांगितले.
वीज ग्राहकांना दिलेली बिले योग्य असून ग्राहकांना बिल भरते वेळी ३ हफ्तात भरण्याची सोय करून देण्यात आली आहे.
-प्रताप मचिये
कार्यकारी अभियंता
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी
पालघर विभाग