भाजपाच्या नव्या कार्यकारिणीवर पंकजा मुंडेंनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले

जनदूत टिम    03-Jul-2020
Total Views |
भाजपाने आज महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर केली आहे. याविषयीची जी पत्रकार परिषद होती त्यात चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. पंकजा मुंडे यांना केंद्रातली जबाबदारी दिली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं.

pankaja_1  H x  
 
त्यांच्या याच वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. नवीन भाजपा महाराष्ट्र टीमचे अभिनंदन माझ्याविषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानते असा ट्विट पंकजा मुंडे यांनी केला आहे.