डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थाची तोडफोड करणाऱ्या आरोपीला अटक

जनदूत टिम    23-Jul-2020
Total Views |
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काही अज्ञान व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना घडली होती. यावेळी अज्ञातांनी घराच्या काचांवर दगडफेक केली होती. तसंच या हल्ल्यात राजगृहातील कुंड्यांचंही नुकसान झालं होतं.

Rajgruha.jpg-22_1 &n 
 
या प्रकरणी उमेश जाधव या आरोपीला ९ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज (बुधवार) विशाल मोरे नावाच्या मुख्य आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. राजगृहावरील हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून त्या घटनेचा निषेध करण्यात आला होता. तसंच पोलिसांनीही त्वरित घटनास्थळाची पाहणी करत तपासाला सुरूवात केली होती. सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि गुप्त बातमीदारांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल मोरे याला आज (बुधवार) अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.