जलयुक्त शिवार योजनेचे शिल्पकार देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस

जनदूत टिम    23-Jul-2020
Total Views |
♦️दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबवून राज्यामध्ये चोवीस टीएमसी पाणी उपलब्ध करणारे कर्तबगार आणि कार्यक्षम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
 
Fadanvis_1  H x
 
♦️आज पर्यंतच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांपेक्षा पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यामध्ये जोरदार यश मिळवले तेव्हा विरोधकांना टीका करण्यासाठी कोणताही मुद्दा सापडला नाही अनेक नेत्यांनी त्यांच्या जातीवर टीका करून आपली हौस भागवून घेतली परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला राजकीय तोल न जाऊ देता अखेरपर्यंत महाराष्ट्राच्या हितासाठी आणि गोरगरीब शेतकरी तसेच गोरगरीब ग्रामीण भागातील माणसाच्या हिताला प्राधान्य देणारे देवेंद्रजी फडणवीस.
 
♦️जलयुक्त शिवार सारखी दुष्काळी भागात संजीवनी देणारी योजना तर शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात विक्री व्यवस्था करुण्यासाठी संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजार योजना अशी महत्त्वाकांक्षी योजना राबवणारे देवेंद्रजी फडणवीस.
 
♦️महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला, ऑनलाइन काम यशस्वी ठरू शकते हे त्यांनी दाखवून दिले ऑनलाईन कार्यपद्धतीमुळे दलाली आणि भ्रष्टाचार याला फाटा मिळाला त्यामुळे थेट लाभार्थी हे या योजनेचे मालक ठरले आणि लोकांना मोठ्या प्रमाणावर आपल्या खात्यावर पैसे मिळाले असे शेतकरी वर्गाला दिलासा देणारे अनेक निर्णय घेणारे मा. देवेंद्रजी फडणवीस.
 
♦️पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताला मिळालेले वरदान ठरले तर महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे आणि शेतकऱ्यांचे खरे कैवारी ठरले ते मा. देवेंद्र फडणवीस
 
♦️अशा शांत अन् संयमी पण अभ्यासु अन् आक्रमक अश्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.