सुशांत आत्महत्या प्रकरण; संजय लीला भन्साली यांची चौकशी होणार

जनदूत टिम    02-Jul-2020
Total Views |
मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बॉलिवूडमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांची सुद्धा चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावण्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजीराव मस्तानी आणि रामलीला या दोन चित्रपटांसंदर्भात संजय लीला भंन्साली यांची चौकशी करण्यात येणार आहे.
 
sanjay-leela_1  
 
बाजीराव मस्तानी आणि रामलीला या दोन चित्रपटांमध्ये आधी सुशांत सिंह राजपूत काम करणार होता. मात्र एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत असलेल्या करारामुळे तो हे सिनेमे करू शकला नाही. आणि म्हणूनच सुशांत आणि यशराज फिल्म्समधील असलेल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. काही सूत्रांनी पोलिसाना माहिती दिली की, या प्रोडक्शन हाऊससोबत संबंध बिघडल्यानंतर सुशांतला इंडस्ट्रीमध्ये एकटं पाडण्याचा प्रयत्न बॉलिवूडमधील काही मंडळी करत होती. ज्यामुळे सुशांतला काम मिळणंही कठीन झालं होतं. मात्र सुशांतने आपल्या मेहनतीवर एमएस धोनी, पीके यासारख्या मोठ्या बॅनरच्या फिल्म मिळवल्या. पण तरीही तो स्वता:ला या इंडस्ट्रीमध्ये एकटाच समजत होता. ज्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेल्याचंही सांगितलं जातंय. म्हणून या माहितीमध्ये काय खरं आहे आणि काय खोटं हे जाणून घेण्यासाठी पोलीस संजय लीला भंसाली यांची चौकशी करणार आहेत. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास दिवसेंदिवस सखोल होत चाललेला आहे.
 
आत्तापर्यंत २८ पेक्षा अधिक लोकांची चौकशी यासंदर्भात करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांचे स्टेटमेन्ट नोंदवले आहेत. आतापर्यंत ज्यांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आली आहेत त्यामध्ये सुशांतचे कुटुंबिय, त्याचे मित्र, तसेच फिल्म इंडस्ट्रीमधील त्याचे मित्र आणि सहकलाकार यांचा समावेश आहे.