सुशीलादेवी पतसंस्थेचे चेअरमन साळुकेना २ दिवसांची पोलीस कोठडी

जनदूत टिम    02-Jul-2020
Total Views |

- आणखी २० लाखांची फसवणूक, ५ ठेवीदारांच्या तक्रारी-ठेवीतून चेअरमन मालामाल

उस्मानाबाद - समय सारथी ठेवीदारांचे पैसे न दिल्याने अटक केलेल्या सुशिलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बालाजी मोहन सालुंके व संचालक गोविंद कुंडलिक चव्हाण या दोघांना न्यायालयाने २ जुलै पर्यंत आणखी २ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी या दोघांना ३० जूनपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. या पतसंस्थेने फसवणूक केल्याप्रकरणी आणखी ५ ते फस ६ तक्रारदार समोर आले असून त्यांची जवळपास २० लाखांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
 
crime012_1  H x
 
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे विभाग करीत असून पोलिसांनी आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र २ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या पतसंस्थेने २०१६ पासून ऑडिट केले नसल्याची माहिती समोर आली. असून ठेवीदारांच्या करोडो रुपयांच्या ठेवीतून पतसंस्थेचे चेअरमन व इतरांनी करोडो रुपयांची स्थावर मालमत्ता घेतल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. या प्रकरणात सरकारी वकील अॅड. जयंत देशमुख तर फसवणूक झालेल्या ठेवीदारांच्या वतीने अॅड. अमोल वरुडकर काम पाहत आहेत. एका ठेवीदाराची तब्बल ६२ लाख रुपयांची मुदतठेवीची रक्कम २०१७ पासून परत न दिल्याने उस्मानाबाद शहरातील सुशीलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बालाजी साळुके यांच्यासह ११ संचालक मंडळावर फसवणुकीसह अन्य कलमान्वये आनंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून २ जणांना अटक केली आहे तर अन्य ९ आरोपी फरार आहेत.
 
उस्मानाबाद शहरातील संभाजी नगर येथील रहिवासी व शंकर स्टीलचे मालक रणजित कांबळे यांनी साळुके यांच्यासह संचालक मंडळाने दाखविलेल्या आकर्षक व्याज दराच्या अमिषानुसार टप्याटप्याने स्वतःच्या व कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने २०१६ या वर्षात ६२ लाख रुपये जमा केले. साळुके यांनी पतसंस्थेत गुंतवणूक करावी, असे सांगत वार्षिक १४.४ टक्के व्याज दराने परतावा देण्याचे आमिष दाखविले. या सर्व रकमेची मुदत २०१७ या वर्षी संपल्यानंतर कांबळे यांनी साळंके यांच्याकडे रकमेची मागणी केली. त्यावेळी त्यांनी बँकेची वसुली सुरु असल्याचे सांगत टाळाटाळ केली व पैसे ३ ते ४ महिन्यात देऊ असे सांगितले.
 
वारंवार पाठपुरावा केल्यावर साळके यांनी कांबळे यांना रक्कम मिळणार नाही, असे सांगत धमकी दिली. त्यामुळे कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसात कलम ४२०, ४०६, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. चेअरमन बालाजी मोहन साळुके, संचालक गोविंद कुंडलिक चव्हाण यांना अटक केली आहे तर उपाध्यक्ष उस्मान निचळकर, मिलींद बाबुराव पेठे, सिद्धार्थ अंगुल बनसोडे, सय्यद समियोद्दीन मशायक, सर्वोत्तम द्वारकानाथ कटके, वैशाली अशोकराव देशमुख, सरोजा गोविंद चव्हाण,ऋषीकेश विजयानंद हंचाटे, श्रीकांत बजरंग तेरकर हे ९ संचालक फरार आहेत. या फसवणुकीची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.