अग्रिमा जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या इम्तियाज शेख याला मुंबई पोलिसांकडून अटक

15 Jul 2020 10:00:14
स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ हिला छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन थेट बलात्काराची धमकी देणाऱ्या इम्तियाज शेख या तरुणाला मुंबई पोलिसांनी अट केली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वत:च तक्रार दाखल करुन घेत इम्तियाजला ताब्यात घेतलं आहे. सोमवारी करण्यात आलेल्या या अटकेच्या कारवाईबद्दल मुंबई पोलिसांनीच ट्विटवरुन माहिती दिली आहे.
 
Umesh-Dada-agrima-joshua_
 
इम्तियाज शेख सोशल मिडियावर उमेश दादा या नावाने अकाउंट चालवतो. याच अकाउंटवरुन त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याप्रमाणी जोशुआबद्दल अपशब्द वापरत, अश्लील भाषेत तिला बलात्काराची धमकी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी स्वत:हून तक्रार नोंदवून घेत शेखला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांच्या अधिकृत अकाउंटवरुन शेखच्या अटकेसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
 
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सु मोटो पद्धतीने तक्रार दाखल करुन घेत अपमानजनक, धमकी देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड करुन शेअर करणाऱ्या उमेश दादा नावाने अकाउंट असणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे. या फोटोवर मुंबई पोलिसांनी, “महिलांना धमकी द्याल तर तरुंगात जाल” अशा ओळी पोस्ट केल्या आहेत.
 
सोमवारी सकाळी वडोदरामध्ये शहर पोलिसांनी जोशुला बत्काराची धमकी देणारा व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या शुभम मिश्राला अटक केली. इन्स्टाग्रामवरुन जोशुआला बलात्काराची धमकी देणाऱ्या शुभमला वडोदरा शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली होती.
Powered By Sangraha 9.0