यूपीएससी पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

05 Jun 2020 23:59:06
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा आणि मुलाखतींचे सुधारित वेळापत्रक शुक्रवारी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले. यानुसार यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि भारतीय वन सेवा- आयएफएसच्या पूर्वपरीक्षा आता रविवार ४ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येतील. यूपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकाकडे डोळे लावून बसलेल्या हजारो उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे.
 
UPSC_1  H x W:
 
यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहेत. तर आयएफएसची मुख्य परीक्षा २८ फेब्रुवारी २०२१ रोजी होईल. एनडीए आणि एनए परीक्षा (I) तसेच एनडीए आणि एनए परीक्षा (II) 2020, या दोन्हीसाठी ६ सप्टेंबर २०२० रोजी एक सामायिक परीक्षा घेण्यात येईल.
 
२१०९ च्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षांसाठी यूपीएससी व्यक्तिमत्व चाचणी २० जुलै २०२० पासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. आयोगाकडून उमेदवारांना स्वतंत्रपणे माहिती दिली जाईल. गेल्या दोन महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या विविध परीक्षा व मुलाखतींबाबत उमेदवारांना स्पष्टता देण्याच्या दृष्टीने ५ जून, २०२० रोजी होणाऱ्या बैठकीत आयोग पुढील परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी करेल” असे एका परिपत्रकात यूपीएससीने म्हटले होते.
Powered By Sangraha 9.0