कपड्यांवर असू शकतो करोना, जाणून घ्या सॅनिटाइझची योग्य पद्धत

जनदूत टिम    30-Jun-2020
Total Views |
करोना व्हायरस अनलॉक १.० मध्ये लोकांना मॉल, मंदिर आणि रेस्टॉरंटमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. करोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी लोक सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्यावर मास्क लावणे तसंच स्वच्छतेच्या नियमांचं पालन करत आहेत . दरम्यान प्राणघातक करोना व्हायरसवर अद्याप प्रभावी लस सापडलेली नाही. त्यामुळे धोका अद्याप टळलेला नाही. अशा परिस्थितीत स्वच्छता पाळण्याकडे दुर्लक्ष करण्याची छोट्यातील छोटी चूक अतिशय महाग पडू शकते.
 
Corona_1  H x W
 
कपड्यांच्या माध्यमातून करोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो किंवा नाही, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण कपड्यांवर सूक्ष्म जीवजंतूचा प्रादुर्भाव सहजरित्या होतो. पावसाळ्यात बॅक्टेरियांचा धोका तुलनेनं जास्त असतो. यामुळे खबरदारी म्हणून बाहेरुन घरी आल्यानंतर कपड्यांची स्वच्छता कशी करायची? याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
ऑफिस किंवा बाजारातून घरी आल्यानंतर आपल्या अंगावरील कपडे काढून ठेवण्यासाठी एक स्वतंत्र बास्केट किंवा बादली घरामध्ये ठेवावी. हे कपडे दुसऱ्या कपड्यांसोबत धुण्याची चूक करू नका. बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात अँटी सेप्टिक लिक्विड किंवा मल्टियूज हायजीन लिक्विड (Antiseptic Liquid or Multiuse Hygiene Liquid) मिक्स करा. या पाण्यामध्ये कपडे भिजत ठेवा. असे केल्यास तुमच्या कपड्यांवरील विषाणूंचा खात्मा होईल तसंच हे विषाणू अन्य कपड्यांच्या संपर्कातही येणार नाहीत.
 
कपडे स्वच्छ धुण्यासाठी शक्य असल्यास गरम पाण्याचा वापर करावा. यामुळे कपड्यांवरील सूक्ष्म जीवजंतूंचा खात्मा होण्यास मदत मिळते. सोबतच कपड्यांची चांगल्या पद्धतीनं स्वच्छता देखील होईल. काही वॉशिंग मशीनमध्ये वॉटर टेम्परेचरचाही पर्याय उपलब्ध असतो. यासाठी तुम्ही ५५ ते ६० डिग्री टेम्परेचर (तापमान) सेट करा. केवळ कपडे धुणेच नाही तर योग्य पद्धतीनं सुकवणे देखील गरजेचं आहे. कपडे पूर्णपणे सुकतील याचीही काळजी घ्यावी.
 
कपडे स्वच्छ धुण्यासाठी केमिकल डिसइन्फेक्टेंटचा वापर करावा. क्लोरीनचा समावेश असलेल्या केमिकल डिसइन्फेक्टेंटचा वापर केल्यास उत्तम. कारण हा घटक कपडे स्वच्छ करण्यासाठी सर्वात उपयुक्त असतो. पण कपडे धुताना याचा थेट वापर करू नये. कारण कपडे खराब होण्याची शक्यता आहे. कपडे धुण्याच्या साबणामध्ये किंवा वॉशिंग पावडर मिक्स करून याचा वापर करावा.
पडे धुण्यासाठी तुम्ही मशिन ऐवजी बादलीचा वापर करत आहात तर सर्व प्रथम एक मगमध्ये पाणी आणि केमिकल डिसइन्फेक्टेंट एकत्र घ्या. यानंतर ते बादलीतल्या पाण्यामध्ये मिक्स करा आणि कपडे धुऊन घ्या.
 
पडे धुतल्यानंतर वॉशिंग मशीन देखील सॅनिटाइझ करणं आवश्यक आहे. वॉशिंग मशीनमध्येही सूक्ष्म जीवजंतू राहू नये, यासाठी ही काळजी घ्यावी. यासाठी एक कापड अँटी सेप्टिक लिक्विड किंवा केमिकल डिसइन्फेक्टेंटमध्ये भिजवा आणि या कापडाच्या मदतीनं वॉशिंग मशीन धुऊन घ्या. यानंतर स्वच्छ पाण्यानं मशीन धुवावी. कपडे धुतल्यानंतर अशाच प्रकारे नियमित मशीन स्वच्छ करणे आवश्यक आहे. कपडे धुण्यासाठी तुम्ही बादलीचा वापर करत आहात का? तर मग लिक्विड किंवा डिटरजेंट पावडरचा स्वच्छतेसाठी वापर करावा. कपडे धुतल्यानंतर ते सुकवणे ( Tips For Drying Clothes Indoors) देखील तितकेच महत्त्वाचे काम आहे. कारण ओल्या कपड्यांमध्ये सूक्ष्म जीवजंतूंचा प्रादुर्भाव (Coronavirus Update) लगेच होतो. कपडे सुकवण्यासाठी तुम्ही ड्रायर मशीनचा वापर करू शकता. यामध्ये कपडे सुकण्यासाठी कमीत कमी वेळ लागतो. ड्रायर नसल्यास कपडे हातानंच चांगले
पिळून घ्या.
- कपडे सुकल्यानंतरच घडी घालून
कपाटात ठेवावे.
- ओल्या कपड्यांची घडी घालू नका.
- कारण ओल्या कपड्यांना वास देखील येतो.
- तसंच कपड्यांवर बुरशी देखील येऊ शकते.