धर्मवीर युवा प्रतिष्ठान कडुन लेनाड गावातील विविध समस्यांबाबात महावितरणला निवेदन

जनदूत टिम    29-Jun-2020
Total Views |
शहापूर : दि.१८/०६/२०२० रोजी धर्मवीर युवा प्रतिष्ठान कडुन लेनाड बु मधील विविध ठिकाणी लोंबकळत असणाऱ्या विधुतवाहक तारा व मोडकलिस आलेले विधुत वाहक पोल या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
 
dhrmaveer yuva Pratishtha
 
निवेदन देण्याचे एकमेव कारण म्हणजे लेनाड गावातील विधुत वाहक पोल हे अतिशय जुने असून ते पूर्ण जीर्ण झाले असून पडन्याच्या सुस्तीतीत आहेत काहि पोल हे पूर्ण एका बाजूने झुकले असून त्यमुळे ते सदर झुकलेल्या पोलच्या बाजूला असणाऱ्या घराच्या छपरावर पडून आर्थिक व जिवित हानि होण्याचा दाट धोका संभवत आहे तसेच काहि ठिकाणी असणाऱ्या विधुत वाहक तारा या पोलशी संपर्क आल्या कारणाने पोलमधे करंट उटरण्याची भीति संभवत आहे त्यामुळे सुद्धा जिवित हानी होण्याचा धोका नाकरता येत नाही तसेच काहि ठिकानी विधुत वाहक तारा सात फूटापर्यंत लोंबकललेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे तेथून ये जा कणाऱ्या वाहनास व कोणत्याही जिवास स्वताचा जिव गमवावा लागू शकतोय या सर्व गोस्टी धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ धिर्डे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संपूर्ण विषयाची पाहनी करुण त्वरित एक निवेदन तयार करुण महावितरण शहापुर येथील कार्यालयात देवून या सर्व समस्यांच निराकारन लवकरात लवकर करण्यात यावे अशी विनंती महावितरणला करन्यात अली.
 
यावेळी महावितरण कडुन देखिल सकारात्मक उत्तर मिळाले असून लवकरच या सर्व समस्यांच निराकारण करण्यात येईल आसे महावितरण कडुन सांगण्यात अले आहे जर महावितरण कडुन या सर्व समस्यापासून लेनाड करांची सुटका करण्यास दिरंगाई होवून कोणतही आर्थिक किवा जिवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जिमेदारी महावितरणची असेल आसे स्पष्ट निवेदनात नमूद करण्यात आले आहे.