सुभाष हरड सर यांच्या हस्ते सोगावच्या श्रद्धा बागराव हिचा सत्कार!

जनदूत टिम    29-Jun-2020
Total Views |
शहापूर : सोगाव पंचायत समिती गणातील सोगाव गावची सुकन्या श्रद्धा दिनकर बागराव हिने एम.पी.एस.सि परीक्षेत यश मिळवून तहसीलदार झाल्याबद्दल आज तिचा सोगाव येथे तिच्या घरी जाऊन सत्कार केला.
 
Subhash Harad_1 &nbs
 
शहापूर पंचायत समितीचे सोगाव गणाचे सदस्य सुभाष हरड सर यांच्या हस्ते श्रद्धा बागराव हिचा शाल,पुस्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्रद्धा ची आई शालिनी दिनकर बागराव मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सोगावचे सरपंच रविंद्र हिरवे, बाळू आप्पा बागराव,नितीन हरड हेही उपस्थित होते.
 
ठाणे जिल्हा परिषदेमध्ये अंबरनाथ पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेल्या शालिनी दिनकर बागराव यांची श्रद्धा ही कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल सोगाव पंचक्रोशीचे नाव सर्वत्र गाजत आहे.