किसान क्रेडीट कार्ड मुळे होणार पशुपालकांना लाभ

जनदूत टिम    29-Jun-2020
Total Views |
ठाणे : पशु पालकांची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी, पशुधन वाढावे यासाठी त्यांना किसान क्रेडीट देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील पशुपालकांना व शेतकऱ्यांना आता पिक कर्जाशिवाय रु. 1 लक्ष 60 हजार येवढ्या रक्कमेचे कर्ज मिळणार आहे. हे कर्ज दुधाळ पशुधन खरेदीसह, शेळी, मेंढी, कुकुट आणि मत्स्य पालनासाठी मिळणार आहे.
 
kisancreditcard_1 &n
 
पशुधनाबरोबर शेळी, मेंढी, कुकुट आणि मत्स्य पालनासाठी पिक कार्जाप्रमानेच पशुपालकांना कर्ज उपलब्ध होणार आहे. हे कर्ज किसान क्रेडीट कार्ड द्वारे उपलब्ध होणार असून कर्जाची मर्यादा रु. 1 लक्ष 60 हजार एवढी असणार आहे. सदर कार्ड शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक, व्यापारी बँक, ग्रामीण बँक यांच्याद्वारे मिळणार असल्याचे सांगितले. या कर्जासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या सात बारा उताऱ्यासह त्यांची वैयक्तिक माहिती, कुटुंबाची माहिती, पशुधनाची संख्या आदी माहितीचा एक अर्ज पंचायत समिती येथे कार्यरत असणारे तालुका पशुधन विकास अधिकारी विस्तार यांच्याकडे सादर करावयाचा आहे. जास्तीत जास्त शेतकरी, पशुपालक यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी त्यांचे अर्ज पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत संबंधित बँकांना सादर करावेत व त्यानंतर बँकेमार्फत पत पुरवठा करण्यात येणार आहे.
 
सदर अर्ज त्या त्या गावातील तलाठी व कृषी सहाय्यक यांच्या सहकार्याने भरून घ्यावेत व ते अर्ज पशुसंवर्धन विभागा मार्फत संबंधित बँकेत सादर करावेत अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेमुळे पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या योजनेतून मिळणाऱ्या 50% व 75% अनुदानाच्या योजनेसाठी प्राथमिक भाग भांडवल किसान क्रेडीट द्वारे मिळणार असून 100% सवलतीमध्ये पशुपालन व्यवसाय सुरु करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे यांनी केले.
 
सदर योजने मुळे शेतकऱ्यांची सावकारांच्या कचाट्यातून मुक्तता होणार आहे. व शेतकऱ्यांना खाद्य, मजुरी, पशु पालनासाठी लागणारा किरकोळ खर्च या कार्ड द्वारे भागविल्या जाणार आहे. करीता जिल्हयातील जास्तीत जास्त पशुपालक यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धनअधिकारी डाॅ.लक्ष्मण पवार यांनी केले आहे.याबाबतची शेतकरी हितार्थ माहिती सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तथा पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष डाॅ. दिलीप धानके यांनी दिली आहे.