गोपीचंद पडळकरांविरोधात बारामतीत गुन्हा दाखल

जनदूत टिम    25-Jun-2020
Total Views |
मुंबई : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल (२४ जून) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. मात्र ही टीका आता पडळकर यांना भोवणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. पडळकरांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
 
Sharad-Pawar-Gopichand-Pa
 
“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर टीका केली होती.
गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात आज पडळकरांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.