मुख्याधिकारी पाटणकर यांची तडकाफडकी बदली प्रशांत रसाळ अंबरनाथचे नवीन मुख्याधिकारी

25 Jun 2020 11:51:57
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांची अवघ्या दिड महिन्यांच्या कार्यकाळातच तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
Shridhar Patankar_1 
 
अंबरनाथ नगरपालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी देविदास पवार यांच्या जागी दिड महिन्यांपूर्वी श्रीधर पाटणकर यांची बदली करण्यात आली होती. पाटणकर यांची अंबरनाथ नगरपालिकेचा मुख्याधिकारी पदाचा पदभार घेताच, अवघ्या काहि दिवसात युध्द पातळीवर चिखलोली येथील ५०० बेडच्या कोविड केंद्राचे काम पूर्ण केले होते.
 
मात्र शहरातील करीना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य आणि निकड विचारात घेवून त्या बाबतच्या उपाय योजनांचा भाग म्हणून शासनाकडून पाटणकर यांच्या बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आल्याचे त्यांच्या आदेशात नमुद करण्यात आले असून, त्यांची मीरा भाईंदर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पाटणकर यांनी कोविड केंद्रासंदर्भतिल्याकाही कामांबाबत काही कोटी रूपयांचा बिलांना मंजुरी देण्यास नकार दिल्यानेही त्यांच्या बदलीसाठी शहरातील काही राजकीय पक्षांकडून बदलीचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चाही नगरपालिकेच्या वर्तुळात रंगली आहे.
Powered By Sangraha 9.0