पाण्यामध्ये बुडालेल्या तीन युवकांचे मृतदेह बाहेर काढणाऱ्या नागरीकांचा पोलीस प्रशासनाकडून सन्मान

जनदूत टिम    24-Jun-2020
Total Views |
कळमनुरी : कळमनुरी तालुक्यातील मौजे मोरगाव आणि ते विसापूर धरणाच्या पाण्यामध्ये होण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली या युवकांचे पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कौशल्याने युवकांचे मृतदेह बाहेर काढून पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल कळमनुरी पोलीस प्रशासनाच्या वतीने मृतदेह बाहेर काढणाऱ्या नागरिकांचा पोलीस प्रशासनामार्फत सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
 
Honors Civilians_1 &
 
दिनांक सात जून रोजी हिंगोली येथील पाच युवक पोहण्यासाठी कळमनुरी तालुक्यातील मौजे मोरगव्हाण येथे ईसापुर धरणात आले होते, या मधील तीन युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्या कारणाने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता, या घटनेची माहिती मिळतात सामाजिक कार्यकर्ते गोताखोर समशेर अलीखा पठाण, शांता पाटील, आप्पा कदम कळमनुरी शहरातून घटनास्थळी पोहोचले यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने तिन्ही युवकांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले होते आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कौशल्याने पाण्यातून मृतदेह बाहेर काढून पोलिसांना यांनी मोठी मदत केली त्याबद्दल पोलीस स्टेशनच्या वतीने समशेर अली खान पठाण, कांता पाटील, आप्पा कदम, नागोराव पाईकराव, ज्योतिबा खंदारे, अमोल खंदारे, काळूराम पाटील, तुळशीराम भिसे, विठ्ठल भिसे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, प्रतिभा शेटे, अहेमद पठाण, शामराव गुव्हाडे, गणेश सूर्यवंशी, संदीप पवार आदींची उपस्थिती होती