भिवंडी पंचायत समितीतील लेखाविभागाला आग

24 Jun 2020 19:55:34
भिवंडी : भिवंडी पंचायत समितीच्या लेखा विभागाला बुधवारी सकाळी आग लागली होती. या आगीत लेखा विभागातील एसी जळून खाक झाला असून इतर साहित्य देखील जळून मोठे नुकसान झाले आहे.
 
Bhiwandi_1  H x
 
सुदैवाने मोठी हानी टळली आहे. या आगीत लेखा विभागातील महत्वाची कागदपत्रे अथवा इतर बाबी जळाल्या किंवा कशा याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान एसी च्या शोर्ट सर्किटमुुळे हि आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0