वांगणी मधील अंध बांधवाना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून भरीव मदत

16 Jun 2020 20:03:07

- पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य मदतीचे वाटप आणि आरोग्य तपासणी शिबीर
-  शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख वामन म्हात्रे, ठाणे जिल्हा शिवसेना सचिव विलास जोशी यांची प्रमुख उपस्थिती

ठाणे / वांगणी : ठाणे जिल्ह्यातील वांगणी विभागातील अंध बांधवांच्या मदतीला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे धावून आले आहेत. या भागात साधारण ५५० च्या आसपास अंध बांधवांची घरं आहेत.
 
Shrikant Shinde_1 &n
 
लोकल ट्रेनमध्ये खेळणी, पेनं, टिकल्या विकून तसेच सुमधूर गाणी गाऊन आपल्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्या या मंडळींना कोरोना साथीच्या संकटकाळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ आल्याची बातमी प्रसारमाध्यमांत आली होती. एका खाजगी वृत्तवाहिनीने सदर गंभीर बाब ट्विटर च्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
 
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्रीएकनाथ शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी याची तात्काळ दखल घेऊन वांगणी परिसरातील या समस्त अंध बांधवांना मदत करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचे सचिव अभिजित दरेकर आणि प्रसाद कवठणकर यांनी रातोरात ५५० अंध बांधवाना पुढील 2 महिना पुरेल इतका धान्य उपलब्ध करून दिला. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत या अन्नधान्य वाटपचे काम स्थानिक शिवसैनिकांच्या मदतीने सुरू होते. सोबतच, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने अंध बांधवाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
 
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन , वन रुपी क्लिनिक आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संयुक्त विद्यमाने वांगणी येथील सर्व अंध बांधवांचे तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात आले. आरोग्य तपासणी शिबीर संपल्यानंतर त्यांना सॅनिटायझर, मास्क, डेटॉल, जीवनसत्त्वांच्या गोळ्या व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. यासमयी सर्व उपस्थित अंध बांधवानी शिवसेना परिवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार मा.ना.डॉ. श्रीकांत शिंदे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, वन रुपी क्लिनिक आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचे कौतुक करत भरभरून आशीर्वाद दिले. याप्रसंगी शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलास ( काका ) जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी शिबीरातील अंध गर्भवती महिला भगिनींना प्रत्येकी ५ हजार अर्थिक मदत दिली तसेच त्यांच्या प्रसूतीचा लागणारा सर्व खर्च करणार असल्याचे जाहीर करून आपला वाढदिवस साजरा केला.
 
Powered By Sangraha 9.0