RDC नी स्वतःच्या खाजगी वाहनांवर अंबर दिवा लावुन फिरत असताना पोलिसांनी हटकल्यावर पोलिसांना धमकी देऊन शिवीगाळ केली

14 Jun 2020 13:20:56
हिंगोली :मो साईनाथ भुमन्ना अनमोड वय ३१ वर्ष व्य, नौकरी पोलीस उपनिरीक्षक पोले हिंगोली शहर मो.क.८६६८४२२०७४. समक्ष पोस्टे ला हजर येवुन प्रथम खबर देतो कि, मी पो.स्टे. हिंगोली शहर येथे दि. २४/०८/२०१९ राजा पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. दिनाक १३/०६/२०२० रोजी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना बंदोबस्त कामी पोस्टे चे बंदोबस्त स्किम प्रमाणे  मी व सोबत पोना/२६८, मपोशि १९२,२५९ होमगार्ड १७३३, टॉफिकचे दोन कर्मचारी सह फिक्स पॉईंट बंदोबस्त इंदिरा चौक  हिंगोली येथे सकाळी ०८.०० वा. पासुन कर्तव्यावर हजर होतो.
 
Lal diva_1  H x
 
सकाळी वेळ अंदाजे ११.५० वा. सु. आम्ही इंदिरा चौक येथे वरील नमुद स्टॉफ सह हजर असताना अकोला बायपास कडून एक चारचाकी वाहन कमांक एम एच.२३ ए.एस ७२२३ ही खाजगी चारचाकी वाहन ज्यावर अंबर दिवा लावलेला इंदिरा चौकात आली असता आम्ही सदर ची गाडी थाबवुन चालकाकडे नाव गाव विचारले असता त्या गाडीचे चालक हे हाफ चड्डीवर वर होते व ते नाव गाव न सांगता म्हणाले कि. मी जिल्हयाचा आरडीसी आहे. तेव्हा आम्ही त्यांना विचारले कि, सदर गाडी सरकारी आहे किंवा खाजगी आहे. तेव्हा त्यांनी म्हटले कि, सदर ची गाडी सरकारी नसुन माझी खाजगी आहे. असे सांगितले. तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो कि, साहेब तुम्हाला खाजगी वाहनावर अंबर दिवा लावता येत नाही. तेव्हा त्यांनी म्हणाले कि, मी आरडीसी आहे, आता तु मला नियम शिकवणार का? तुझी काय औकात आहे ये, थांब तुझ्या एस.पी.ला फोन लावतो असे म्हणुन कोणालातरी फोन लावुन आम्हावर बोलण्यासाठी दबाव टाकला परंतु आम्ही फोनवर बोललो नाही.
 
आम्ही पोना/२६८ यांना गाडीमध्ये बसा आणि गाडी पोलीस स्टेशनला घ्या असे सांगुन गाडीचा दार उघडला असता त्यांनी पुन्हा आम्हाला अबे साल्या माझी गाडी सोड, माझी गाडी कुठे घ्यायची ते सांग तेथे घेतो. आत्ता तुला दाखवतो असे म्हणुन धमकावले. त्यानंतर आम्ही सोबतचे कर्मचारी पोना/२६८ यांना गाडीत बसवून पोस्टेला गाडी घ्या असे सांगुन पोस्टे ला गाडी पाठविली. आणि आम्ही आमच्या गाडीने पोस्टे ला हजर आलो. तेव्हा मा. पोनि श्री सय्यद सो यांनी मला कॅबीनमध्ये बोलावलेने मी गेलो असता, तेथे ही मा. पोनि सय्यद सो यांचे समक्ष आरडीसी साहेब मला म्हणाले कि, तुझी काय औकात आहे बे माझी गाडी पकडायची. तु मला कायदा शिकवणार का. असे म्हणत अरेरावीची भाषा करित अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही सदर घटनेबाबत सविस्तर नोंद घेतली.
 
आमच्या नोंदी नंतर मा. म.प्रो. पो.उपाधिक्षक जगताप मॅडम यांनी ही सदर घटनेबाबत एक नोंद घेतलेली आहे. त्यावरून आम्हाला आर.डी.सी. साहेब यांचे नाव श्री सुर्यवंशी असल्याचे समजले. त्यानंतर मा. अपर पोलीस अधिक्षक श्री काळे साहेब. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वैजने साहेब, यांनी सदर प्रकरण मिटवून घ्या असे मला समजावून सांगितले. तसेच सदरची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.२३ ए.एस. ७२२३ ही व आ.डी.सी. श्री सुर्यवंशी साहेब यांना कोणतेही चालान न करता बेकायदेशिररित्या सोडुन दिले. आरडीसी श्री सूर्यवंशी साहेब हे वेळ ११.५० वा. च्या सुमारास चड्डीवर बाहेर निघाले होते, कोणत्याही शासकीय कर्तव्यावर नव्हते याबाबत पुरावा म्हणून ते पोस्टे ला आले होते तर त्यावेळचे पोस्टे चे सीसीटीव्ही फुटेज तपासिक अधिकारी यांनी हस्तगत करावे हि विनंती.
 
तरी आज दि. १३/०६/२०२० रोजी सकाळी ११.५० वा च्या सुमारास बंदोबस्त स्किम प्रमाणे मी व सोबत पोना/२६८, मपोशि १९२,२५९ होमगार्ड १७३३, ट्रॉफिकचे दोन कर्मचारी सह फिक्स पॉईट बंदोबस्त इंदिरा चौक हिंगोली येथे सकाळी ०८.०० वा. पासुन कर्तव्यावर हजर असतांना यातील आरडीसी सुर्यवंशी साहेब यांनी अंबर दिवा वापरणेबाबत कोणताही परवाना नसलेल्या स्वत:च्या खाजगी चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.२३ ए.एस. ७२२३ वर अंबर दिवा लावुन -अरेरावीची भाषा करित, अश्लिल शिवीगाळ करून, तुला दाखवतो असे धमकावुन, आम्ही करित असलेले कर्तव्यात अडथळा निर्माण केले. म्हणुन त्यांचे विरूद्ध कलम ३५३,२९४,५०६,१८८ भादवि सह कलम १०८ केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९, सह कलम १७९ महाराष्ट्र मोटार वाहन कायदा प्रमाणे माझी प्रथम खबर आहे.
Powered By Sangraha 9.0