पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे यांचे अपघाती निधन

जनदूत टिम    11-Jun-2020
Total Views |
अमळनेर : अमळनेर येथील पोलिस उपअधीक्षक (DySP) राजेंद्र ससाणे यांचा कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास नाशिक जवळील वडाळी भोई परिसरात घडली. शिस्तप्रिय पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

DYSP-Rajendra-Sasane_1&nb 
 
अमळनेर शहरासह तालुक्यात लॉकडाऊन शिथिल झाल्याने पोलिस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे हे दोन दिवसापूर्वी रजा टाकून आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आणि नियमित आरोग्य तपासणी करिता नाशिक येथे गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने जात असताना वडाळी भोई जवळ त्यांच्या कारला अपघात झाला. ते स्वतः कार चालवत होते. यात त्यांची कार सुमारे दीडशे फूट दरीत कोसळली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.